Homeचिट चॅटयोगेश त्रिवेदी आणि...

योगेश त्रिवेदी आणि मंगेश चिवटे यांना ‘दर्पण’ पुरस्कार

ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी आणि आरोग्य सेवेसाठी झोकून देऊन काम करणारे मंगेश चिवटे यांना महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे 2020चे आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक ‘दर्पण’कार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधी या राज्यस्तरीय संस्थेतर्फे दरवर्षी देण्यात येणार्‍या 28व्या ‘दर्पण’ पुरस्कारांची घोषणा संस्थेचे अध्यक्ष रविंद्र बेडकिहाळ यांनी आज फलटण येथे केली.

विभागवार जाहीर केलेले ‘दर्पण’ पुरस्कार खालीलप्रमाणे-

1) मराठवाडा विभागातून आनंद कल्याणकर, नांदेड (आकाशवाणी प्रतिनिधी).

2) विदर्भ विभागातून डॉ. रमेश गोटखडे, अमरावती (स्तंभलेखक, दै. हिंदुस्थान अमरावती).

3) पश्‍चिम महाराष्ट्रातून विनोद शिरसाट (पुणे), ज्येष्ठ लेखक व संपादक, हिरक महोत्सवी सा. साधना (पुणे).

4) उत्तर महाराष्ट्र नाशिक विभागातून मिलींद चवंडके, पत्रकार, अहमदनगर.

5) कोकण विभागातून प्रमोद कोनकर, संपादक, सा. कोकण मीडिया, रत्नागिरी.

6) मुंबई विभागातून रविंद्र मालुसरे, संपादक, सा. पोलादपूर अस्मिता, मुंबई.

7) महिला विभागातून नम्रता फडणीस, विशेष प्रतिनिधी, दै. लोकमत, पुणे.

विशेष ‘दर्पण’ पुरस्कार:

1) शिवाजी पाटील, प्रतिनिधी, दै. लोकमत, राधानगरी (कोल्हापूर).

2) अ‍ॅड. बाबुराव हिरडे, संपादक, सा. कमला भवानी संदेश, करमाळा (सोलापूर).

3) प्रा. रमेश आढाव, तालुका प्रतिनिधी, दै. तरुण भारत, फलटण (सातारा).

गेल्या वर्षी जाहीर केलेले सन 2019चे पुरस्कार कोव्हिड-19च्या परिस्थितीमुळे समारंभपूर्वक देता आले नाहीत. आता हे दोन्ही पुरस्कार कोविडच्या परिस्थितीत राज्य शासनाच्या निर्देशानुसार बाळशास्त्री जांभेकरांच्या जन्मगावी पोंभुर्ले ता. देवगड, जि. सिंधुदूर्ग येथे संस्थेने उभारलेल्या महाराष्ट्रातील पहिल्या ‘दर्पण’ स्मारक प्रकल्पातील ‘दर्पण’ सभागृहात समारंभपूर्वक देण्यात येतील. या सर्व पुरस्कारांचे स्वरूप रोख 2,500/-, सन्मानपत्र, जांभेकरांचे चरित्र ग्रंथ, जांभेकरांचे व महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीचे कार्य यावरील माहितीपट (सी.डी.), शाल, श्रीफळ असे आहे.

सर्व पुरस्कारप्राप्त पत्रकारांचे संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब जाधव (सातारा) व कृष्णा शेवडीकर (नांदेड) तसेच कार्यकारी विश्‍वस्त विजय मांडके (सातारा) यांनी अभिनंदन केले आहे.

Continue reading

महाराष्ट्राला मिळणार ४८ऐवजी ७२ खासदार?

भारतीय लोकशाहीत एक ऐतिहासिक बदल घडण्याच्या उंबरठ्यावर आहे. केंद्र सरकार "नारी शक्ती वंदन अधिनियम"मध्ये महत्त्वपूर्ण संशोधन करण्याच्या तयारीत आहे. या प्रस्तावित संशोधन विधेयकाद्वारे लोकसभेतील जागांची संख्या सध्याच्या ५४३वरून ८१६पर्यंत वाढवण्यात येईल. या ८१६ जागांपैकी एक तृतीयांश म्हणजे तब्बल २७३...

इराणसोबतचे युद्ध हा अमेरिकेने खेळलेला जुगार!

आज जागतिक भू-राजकारण अशा वळणावर उभे आहे जिथे लष्करी संघर्षाचा धूर थेट सामान्य माणसाच्या किचन आणि उद्योगांच्या ताळेबंदापर्यंत पोहोचला आहे. अमेरिकेचे इराणसोबतचे युद्ध केवळ लष्करी वर्चस्वाची लढाई राहिलेली नाही, तर ती जागतिक अर्थव्यवस्थेसाठी एक मोठी धोक्याची घंटा ठरत आहे....

रजनीकांतही म्हणतात- ‘बॉक्स ऑफिस का बाप’!

बॉलीवूडमध्ये "सुपरस्टार" हा शब्द हल्ली खूप सहजपणाने वापरला जातो. पण जेव्हा खुद्द रजनीकांत एखाद्या चित्रपटाला "मस्ट वॉच" म्हणतात आणि त्याला "बॉक्स ऑफिस का बाप" असे संबोधतात, तेव्हा समजायचे की, काहीतरी असाधारण घडले आहे. रजनीकांत यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट...
Skip to content