Homeकल्चर +जयपूर महोत्सवात मिळाला...

जयपूर महोत्सवात मिळाला ‘दाल रोटी’ला पुरस्कार

१६व्या जयपूऱ चित्रपट महोत्सवात ‘दाल रोटी’ चित्रपटाला विशेष ज्युरी पुरस्कार देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार चित्रपटाच्या दिग्दर्शिका ज्युली जास्मिन यांनी राजस्थानचे माजी मुख्य सचिव निरंजन आर्य, बी. एस. रावत, होनू रोज आदी मान्यवरांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी सिनेरसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हा चित्रपट येत्या ६ सप्टेंबरपासून देशभर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाची इफ्फी २०२४च्या महोत्सवासाठीदेखील निवड झाली आहे. प्रसिद्ध निर्माते सलीम या चित्रपटाचे निर्माते असून ज्युली जास्मिन दिग्दर्शिका आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर भाष्य करून त्यांची सोडवणूक करण्याची प्रेरणा देणारा हा चित्रपट देशातील शेतकरी आणि जनतेसाठी शेती तसेच देशभक्तीचा संदेश देणारा आहे.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content