Homeटॉप स्टोरीमाघी गणेशोत्सवावरही कोरोनाचे...

माघी गणेशोत्सवावरही कोरोनाचे सावट!

येत्या १५ फेब्रुवारीपासून म्हणजेच सोमवारपासून सुरू होणाऱ्या माघी गणेशोत्सवासाठी राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून त्यात गणेश मूर्ती आणि मंडपांच्या आकारावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

भाद्रपदातील गणेशोत्सवाप्रमाणे माघी गणेशोत्सवही नियमांच्या चौकटीत राहून साजरा करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. मंडप उभारणीसाठी पालिकेची अथवा स्थानिक प्रशासनाची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. मंडप मर्यादित आकाराचा असावा, आगमन-विसर्जन मिरवणुका काढता येणार नाहीत. सार्वजनिक मूर्तीची उंची चार फूट तर घरगुती मूर्तीची उंची दोन फूट असावी. शक्य असल्यास धातूच्या किंवा संगमरवरी मूर्तीचे पूजन करावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

मंडपात एका वेळी १०पेक्षा जास्त कार्यकर्ते आणि १५पेक्षा अधिक भाविक नसावेत. सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी सामाजिक उपक्रम, रक्तदान किंवा आरोग्य शिबीर अशा कार्यक्रमांना प्राधान्य द्यावे. ऑनलाइन किंवा केबल नेटवर्कच्या माध्यमातून दर्शनाची सोय करावी. मंडपात सामाजिक अंतराचे पालन करावे. वेळोवेळी मंडपाचे र्निजतुकीकरण करावे. येणाऱ्या भाविकांची तापमान तपासणी, मुखपट्टीचा वापर, स्वच्छतेचे नियम आदींबाबत दक्षता बाळगावी असे स्पष्ट करण्यात आले आहे. विसर्जनालाही केवळ पाच कार्यकर्त्यांना परवानगी असेल. शिवाय ज्यांना शक्य असेल त्यांनी घरीच गणेश विसर्जन करावे असेही नियमावलीत सांगण्यात आले आहे.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content