मिस वर्ल्ड स्पर्धेच्या संस्थापक ज्युलिया मॉर्ले यांच्यासह जगातील विविध देशांतून आलेल्या मिस वर्ल्डच्या स्पर्धकांनी ताडोबा महोत्सवाला भेट देत व्याघ्र संवर्धनाचा नुकताच संदेश दिला.
राज्याचे वन, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारातून तीन दिवसीय ताडोबा महोत्सवाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने सरकारच्या ‘सेव्ह द टायगर’ मोहिमेला मिस वर्ल्डच्या सर्व स्पर्धकांनी आपले समर्थन जाहीर केले आहे.