Homeब्लॅक अँड व्हाईटदेशातल्या पहिल्या अपतटीय...

देशातल्या पहिल्या अपतटीय गस्ती जहाजाची बांधणी सुरू

गोव्यातील मे. गोवा शिपयार्ड लिमिटेड येथे पहिल्या नेक्स्ट जनरेशन ऑफशोअर पॅट्रोल व्हेसल्समधील पहिल्या अपतटीय गस्ती जहाजाचा नौकातल भरणी अर्थात जहाजबांधणी समारंभ नुकताच संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युद्धनौका उत्पादन आणि अधिग्रहण नियंत्रक व्हाईस अ‍ॅडमिरल बी. शिव कुमार, गोवा शिपयार्ड लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक बी. के. उपाध्याय आणि भारतीय नौदल व मे. गोवा शिपयार्ड लिमिटेडमधले वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

अशा 11 गस्ती जहाजांच्या संरचना आणि बांधणीसाठी संरक्षण मंत्रालय व  मे. गोवा शिपयार्ड लिमिटेड, गोवा आणि मे. गार्डन रिच शिपबिल्डर्स अँड इंजिनिअर्स,(जीआरएसई), कोलकाता यांच्यात 30 मार्च 23

रोजी करार झाले. त्यानुसार सुरुवातीला सात नौका मे. गोवा शिपयार्ड लिमिटेडने तर चार नौका जीआरएसईने बांधायच्या आहेत.

नेक्स्ट जनरेशन ऑफशोअर पॅट्रोल व्हेसल्सचा वापर तस्करी प्रतिबंध, तटीय सुरक्षा आणि टेहळणी, शोध व बचाव, तटीय मालमत्तेचे संरक्षण या मोहिमांसाठी केला जाईल. ही जहाजे भारतीय नौदलाला हिंद महासागर क्षेत्रात राष्ट्राच्या आर्थिक आणि भू-राजकीय हितसंबंधांचे संरक्षण करण्यासाठी आपली लढाऊक्षमता वृद्धींगत करण्यात साहाय्यभूत ठरतील. भारतीय नौदलाच्या स्वदेशी जहाजबांधणीच्या प्रयत्नात हा आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे आणि ‘आत्मनिर्भर भारत’ व  ‘मेक इन इंडिया’ उपक्रमांशी सुसंगत आहे.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content