Homeहेल्थ इज वेल्थमानसिक आरोग्याचं महत्त्व...

मानसिक आरोग्याचं महत्त्व सांगणारी परिषद उद्यापासून पुण्यात!

मानसिक आरोग्याचं प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात असलेले महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. विशेषतः आपले मानसिक आणि शारीरिक आरोग्य यांचा समतोल राखणे किती आवश्यक आहे हे कोरोना महामारीच्या काळात अधोरेखित झालं आहे. या संपूर्ण विषयावर अधिक जनजागृती करण्याच्या उद्देशानं ए. पी. जे. ग्लोबलने पुण्यात उद्यापासून ‘स्वास्थ्यम्’, या तीन दिवसांच्या परिषदेचं आयोजन केलं आहे.

 मानसिक आरोग्य आणि स्वास्थ्य याबाबत लोकांमध्ये जागृती करण्याच्या हेतूनं ही परिषद आयोजित करण्यात आली आहे. गणेश कला क्रीडा केंद्र, पुण्याचे जे. डब्ल्यू. मॅरिएट आणि डीपी रस्त्यावरील पंडित फार्मस् अशा तीन ठिकाणी ही तीन दिवसांची परिषद होत आहे. योग, फिटनेस, मानसिक आरोग्य जपणुकीसाठी संगीताचे महत्त्व अशा विविध विषयांवर या परिषदेत मार्गदर्शन केलं जाणार आहे. ९ ते ११ डिसेंबर, २०२२ या काळात ही परिषद होणार आहे.

‘स्वास्थ्यम्’च्या व्यासपीठावर आरोग्य आणि स्वास्थ्य या क्षेत्रातले विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या मान्यवरांकडून त्यांच्या सत्रांना उपस्थित राहणाऱ्यांना परस्पर संवादाच्या माध्यमातून मार्गदर्शन केलं जाणार आहे.

डॉ. कुमार विश्वास, डॉ. हंसराज योगेंद्र, सर्वेश शसी, डॉ. राजेंद्र बर्वे, योगी श्री एम, ‘इस्कॉन’चे गौरांग दास, प्रख्यात अभिनेत्री आणि हेल्थ आयकॉन शिल्पा शेट्टी, उस्ताद रशिद खाँ आणि रुहानी सिस्टर्स हे संगीत क्षेत्रातले मान्यवर, मार्शल आर्टमधले तज्ज्ञ चिता यज्नेश शेट्टी, आवाजाच्या माध्यमातून उपचार करणाऱ्या प्रियांका पटेल, आहारतज्ज्ञ नुपूर पाटील स्वास्थ्यम् परिषदेच्या माध्यमातून उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. अभिनेते रितेश देशमुख आणि त्यांच्या पत्नी जेनिलिआ देशमुख हेदेखील परिषदेच्या शेवटच्या दिवशी उपस्थित राहून या आगळ्या उपक्रमाला आपला पाठिंबा देणार आहेत.

मानसिक आणि शारिरिक आरोग्याचे महत्त्व आणि त्यांचा परस्पर संबंध याबाबत जागृती व्हावी यासाठी हा जागतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. पुण्यात तरुणाई आणि विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. त्याचबरोबर विविध क्षेत्रात भरीव कार्य करणारेही या शहरात वास्तव्यास आहेत. या परिषदेच्या निमित्ताने मानसिक आणि शारीरिक आरोग्याबाबत विविध वयोगटांशी चर्चा करुन जागृती करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. विशेषतः देशाचे भविष्य असलेल्या तरुण वर्गात याबाबत जागृती होऊन त्याचा सकारात्मक परिणाम समाजावर व्हावा, हा ही परिषद आयोजित करण्यामागचा हेतू आहे.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content