भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते व पक्षाचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे यांच्या मातोश्री विजया (माई) श्रीधर तावडे यांच्या निधनानिमित्त येत्या १५ तारखेला (शनिवार) मुंबईतल्या विलेपार्ले (पूर्व) येथील पाटीदार हॉलमध्ये शोकसभेचे आयोजन करण्यात आले आहे.
पार्लेश्वर मंदिरासमोर असलेल्या या हॉलमध्ये येत्या शनिवारी संध्याकाळी पाच ते सात या वेळेत ही सभा होईल. विनोद तावडे यांचा फार मोठा मित्रपरिवार आहे. या सर्वांना येथे आपल्या भावनांना वाट मोकळी करून देता येईल. माईंचे १० एप्रिलला संध्याकाळी प्रदीर्घ आजाराने वयाच्या ८५व्या वर्षी निधन झाले.

