Homeचिट चॅटमंगला अडसूळ स्मृती...

मंगला अडसूळ स्मृती बुद्धीबळ स्पर्धेसाठी १०६ खेळाडूंत चुरस

आयडियल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे उद्यापासून आयोजित करण्यात आलेल्या मंगला आनंदराव अडसूळ स्मृती चषक शालेय मुलामुलींच्या आणि खुल्या बुद्धीबळ स्पर्धेत मुंबई शहर-उपनगर, ठाणे, पालघर आदी जिल्ह्यांतील आंतरराष्ट्रीय फिडे गुणांकित बुद्धीबळपटूंसह १०६ खेळाडूंमध्ये चुरस असेल.

को-ऑपरेटिव्ह बँक एम्पलॉईज युनियन-मुंबई आणि युनियनचे अध्यक्ष व माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आनंदराव अडसूळ यांच्यावतीने विजेत्या-उपविजेत्यांना एकूण ३० रोख व ७५ चषक पुरस्कार दिले जाणार आहेत. २० व २१ जुलै दरम्यान ही स्पर्धा आरएमएमएस वातानुकूलित हॉल, परेल, मुंबई-१२ येथे रंगणार आहे.

आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुद्धीबळ संघटनेच्या सहकार्याने शालेय मुलामुलींची ८/१०/१२ वर्षांखालील वयोगटाची बुद्धीबळ स्पर्धा होत आहे. ही स्पर्धा खुली जलद तसेच स्विस लीग पद्धतीने होणार आहे. खुल्या व वयोगटामधील प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. संयोजकांतर्फे बुद्धीबळपट, घड्याळ आदी साहित्य पुरविण्यात येणार आहे. बुद्धीबळपटूंच्या आग्रहास्तव स्पर्धा प्रवेशअर्जाची मुदत आज, १९ जुलैपर्यंत वाढविण्यात आली असून संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुद्धीबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (व्हॉटस अॅप क्रमांक ९३२४७ १९२९९) यांच्याकडे संपर्क साधावा.

Continue reading

तांदळाभोवती फिरणार जपानची पुढची निवडणूक!

जपानमध्ये तांदूळ हे केवळ एक मुख्य अन्न नाही, तर ते जपानच्या संस्कृतीचा, अर्थव्यवस्थेचा आणि राष्ट्रीय अस्मितेचा अविभाज्य भाग आहे. मात्र, सध्या तांदळाचा अभूतपूर्व तुटवडा आणि गगनाला भिडलेल्या किमतींमुळे देशात एक मोठे राजकीय संकट निर्माण झाले आहे. गेल्या एका वर्षात...

यंदाच्या ‘इफ्फी’त पदार्पण करणार जगभरातील सात कलाकृती!

यंदाच्या 56व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (इफ्फी) जगभरातील पदार्पण करणाऱ्या सात कलाकृती प्रदर्शित होणार असून आंतरराष्ट्रीय चित्रपटसृष्टीतील उत्कृष्ट नव प्रतिभेला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने, सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कारासाठी पाच आंतरराष्ट्रीय आणि दोन भारतीय चित्रपटांची निवड केली जाणार आहे. विजेत्याला रूपेरी मयूर,...

राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक

कृषी क्षेत्रात भांडवली गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा तयार करण्याकरीता गुंतवणूक करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. जून ते सप्टेंबरदरम्यान अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी सरकारने हा निर्णय घेतला. कृषी समृद्धी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना ड्रोन,...
Skip to content