Homeहेल्थ इज वेल्थकोविड-19बाबत अफवांचा महापूर...

कोविड-19बाबत अफवांचा महापूर रोखण्यासाठी पुढे या!

कोविड-19 संदर्भात सावधगिरी बाळगणे आणि मास्क वापर यासारखे कोविड प्रतिबंधक नियमांचे पालन याबरोबरच माहितीसंसर्ग रोखणे आणि फक्त योग्य व खात्रीशीर माहितीच शेअर करणे हे महत्त्वाचे आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय कोविड-19ला अटकाव आणि व्यवस्थापन याबाबत वेळोवेळी माहिती सार्वजनिक करते. त्यामुळे प्रमाणित असलेली सत्य माहितीच शेअर करावी आणि इतरांनाही ते करण्यास प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी काल देशभरातील 100 डॉक्टर आणि भारतीय वैद्यक संस्था म्हणजे IMAच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधताना केले.

कोविड-19शी देशाच्या लढ्यात आपण सर्व आमचे दूत राहिला आहात. तुमच्या योगदानाची आम्ही यथोचित दखल घेतली आहे. आपल्या निस्वार्थी योगदानाला तसेच आरोग्यव्यावसायिकांच्या सेवेला मी सलाम करतो. कोविड-19 या आजाराच्या विविध पैलूंची माहिती देऊन तसेच त्याला रोखण्याचे आणि व्यवस्थापनाचे उपाय, यावर सर्वसामान्यांना शिक्षित करुन गैरमाहितीचा संसर्ग रोखण्यातही आपण सहभागी व्हावे, आमचे दूत व्हावे असे आवाहनही त्यांनी केले.

आपले नागरीक कोविड योध्यांकडे सल्ला विचारतात आणि जगभरात पुन्हा वाढू लागलेल्या कोविड-19च्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर अफवा, चुकीची माहिती पसरुन परिणामी भीती वाढू नये म्हणून योग्य माहिती सार्वजनिक करणे ही आपल्या तज्ज्ञांची जबाबदारी आहे, असेही मांडविया म्हणाले.

नागरिकांना देशातील कोविड-19 आजारासंदर्भातील सद्यस्थितीची माहिती, लसीकरण कार्यक्रम आणि सरकारचे प्रयत्न यांची माहिती देऊन त्यांच्यात निर्माण झालेली भीती कमी करण्यावर केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी भर देतानाच त्यांनी आत्मसंतुष्टीच्या विरोधात त्यांनी इशारा दिला. चाचणी-मागोवा-उपचार-लसीकरण आणि कोविड संदर्भातील योग्य वर्तणूक तसेच कोविडचा अधिक धोका असलेल्या गटांसाठी खबरदारीची मात्रा घेतली जाणे या उपाययोजनांचे कठोरतेने पालन करावे अशा सूचना त्यांनी संबंधितांना दिल्या.

या महामारीच्या व्यवस्थापनासंदर्भात आमच्या भूतकालीन अनुभवांवरून, आम्ही अनेक उपक्रम हाती घेत आहोत. मॉक ड्रील हा असाच एक उपक्रम देशभरात आयोजित करण्यात आला आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे आपली परिचालनविषयक सज्जता समजण्यास मदत होते, यंत्रणेत काही कच्चे दुवे राहून गेले असल्यास त्यांची पूर्तता करता येते आणि परिणामी, आपला सरकारी आरोग्य यंत्रणाविषयक प्रतिसाद अधिक सशक्त होत जातो, असेही ते म्हणाले.

केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव लव्ह अग्रवाल, आरोग्य सेवा महासंचालक डॉ. अतुल गोयल, भारतीय आरोग्य संघटनेचे सदस्य, वरिष्ठ वैद्यकीय व्यावसायिक आणि तज्ज्ञ या बैठकीला उपस्थित होते.

Continue reading

आशाताईंना देशभरातून भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी पसरताच देशभरातून शोकसंदेशांचा गहिवर लोटला. राष्ट्रपती भवनापासून ते सामान्य चाहत्यांपर्यंत, आणि मुंबईच्या गल्लीबोळांपासून ते आखाती देशांतील रेस्तराँपर्यंत, सर्वांनीच या महान स्वराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशाताई रुग्णालयात दाखल...

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...
Skip to content