7 ते 15 वर्षांची मुले करू शकतील मोफत आधार अपडेट

जनहिताचा निर्णय म्हणून भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने 7 ते 15 वर्षे वयोगटातील मुलांसाठी अनिवार्य असलेल्या बायोमेट्रिक अपडेटचे सर्व शुल्क माफ केले आहे. या निर्णयामुळे जवळजवळ 6 कोटी मुलांना त्यांचे आधार कार्डाचे विनामूल्य बायोमेट्रिक अपडेट करता येतील. 1 ऑक्टोबर 2025पासून शुल्कमाफीचे हे नियम लागू झाले असून ते पुढील एक वर्षासाठी अंमलात राहतील.

पाच वर्षांखालील मुलांचा आधार नोंदणी करताना फक्त छायाचित्र, नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि जन्मप्रमाणपत्र घेतले जाते. या वयात मुलांचे बोटांचे ठसे आणि डोळ्यांचे (आयरिस) बायोमेट्रिक परिपक्व नसल्याने त्यांची नोंद घेतली जात नाही. सध्याच्या नियमांनुसार, मुलगा किंवा मुलगी पाच वर्षांचा झाल्यावर त्याचे किंवा तिचे बोटांचे ठसे, आयरिस आणि छायाचित्र अद्ययावत करणे बंधनकारक असते. याला पहिले अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट असे म्हटले जाते. तसेच मुलगा किंवा मुलगी 15 वर्षांचा झाल्यावर पुन्हा एकदा बायोमेट्रिक अद्ययावत करणे आवश्यक असते, ज्याला दुसरे अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट म्हटले जाते. पहिला आणि दुसरा अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट अनुक्रमे 5 ते 7 आणि 15 ते 17 वर्षे वयोगटात केल्यास त्यासाठी शुल्क आकारले जात नाही. त्यानंतर प्रत्येक अनिवार्य बायोमेट्रिक अपडेटसाठी 125 रुपये शुल्क आकारले जाते. या नव्या निर्णयामुळे आता 5 ते 17 वयोगटातील सर्व मुलांसाठी अनिवार्य बायोमेट्रिक अपडेट वर्षासाठी मोफत झाले आहे.

अद्ययावत बायोमेट्रिक असलेल्या आधारमुळे मुलांचे दैनंदिन जीवन सुलभ होते. शाळेत प्रवेश, प्रवेश परीक्षांसाठी नोंदणी, शिष्यवृत्ती आणि थेट बँक खात्यात पैसे जमा (थेट लाभ हस्तांतरण), योजनांचा लाभ घेणे यांसारख्या सेवांचा अखंडित वापर करता येतो. आईवडील किंवा पालकांनी आपल्या मुलांचे किंवा पाल्यांचे आधार बायोमेट्रिक तातडीने अद्ययावत करावेत, असे आवाहन प्राधिकरणाकडून करण्यात आले आहे.

Continue reading

नासाची ऐतिहासिक भरारी: चंद्राजवळून घेतले पृथ्वीचे विलोभनीय दर्शन!

नासाच्या 'आर्टेमिस २' मोहिमेने अंतराळ संशोधनाच्या इतिहासात एक नवा अध्याय लिहिला आहे. या मोहिमेतील अंतराळवीरांनी चंद्राच्या अतिशय जवळून पृथ्वीचे जे फोटो पाठवले आहेत, ते पाहून संपूर्ण जग थक्क झाले आहे. अथांग काळोखात तरंगणाऱ्या आपल्या निळ्याशार पृथ्वीचे हे फोटो इतके...

भारताचा राष्ट्रीय समुद्री दिवस! समुद्री स्वातंत्र्याची धाडसी कहाणी!!

आज ५ एप्रिल २०२६. ५ एप्रिल १९१९... मुंबई बंदरात रात्रीचा अंधार, वादळी वारे आणि उंच लाटांचा गर्जना! ब्रिटिश साम्राज्य समुद्रावर पूर्णपणे राज करत होतं. भारतीयांना जहाज चालवण्याचीसुद्धा परवानगी नव्हती. एक चूक आणि सगळं संपलं! पण, त्या रात्री एक छोटंसं...

तुमचा कॅमेरा बंद तर नाही ना?

एक एप्रिल २०२६पासून भारतात लागू झालेल्या नव्या सीसीटीव्ही नियमांमुळे नागरिकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला. “घरातील कॅमेरा बंद पडणार का?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला. मात्र, केंद्र सरकारच्या नव्या धोरणानुसार, आधीपासून वापरात असलेल्या कॅमेर्‍यांवर कोणताही परिणाम होणार नसून, हा निर्णय मुख्यतः...
Skip to content