बांगलादेशमध्ये चाललेल्या हिंसक आंदोलनाची धग कमी करण्यासाठी आज बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश ओबैदुल हसन यांनी आपल्या पदाचा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते.

बांगलादेशमधल्या आंदोलनाची धग अजूनही कायम आहे. आज तिथल्या आंदोलकांनी बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयाला घेरले आहे. आंदोलकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्याधीशांसह सात न्याधीशांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

बांगलादेशमधल्या हिंसक आंदोलनानंतर तिथल्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा देऊन बांगलादेशातून पळ काढला आहे. सध्या भारताच्या आश्रयाखाली गाझियाबादच्या हिंडन हवाईतळावर वास्तव्याला आहेत. त्यानंतर तेथे महम्मद युनूस यांनी हंगामी पंतप्रधान म्हणून बांगलादेशची सूत्रे हाती घेतली आहेत.