Homeब्लॅक अँड व्हाईटजम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीचे...

जम्मू-काश्मीरमधील चिनाब नदीचे पाणी आले वळवण्यात!

किश्तवार जिल्ह्यातील द्राबशल्ला येथे 27 जानेवारी 2024 रोजी सकाळी 11.30 वाजता चिनाब नदीला बोगद्यातून वळवून जम्मू आणि काश्मीरमधील 850 मेगावॅटच्या रटल जलविद्युत प्रकल्पाने एक मोठा टप्पा गाठला आहे. नदीचा प्रवाह वळवल्यामुळे उत्खनन आणि धरणाचे बांधकाम सुरू करण्यासाठी नदीच्या पात्रातील धरणक्षेत्र वेगळे करणे शक्य होईल. यामुळे प्रकल्पाच्या बांधकामाला गती येईल आणि संभाव्य विलंब कमी झाल्यामुळे मे 2026च्या नियोजित कार्यान्वित तारखेची पूर्तता करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न फलद्रुप होतील.

नदीप्रवाह वळवण्याच्या या समारंभाचे उद्घाटन नॅशनल हाइड्रोइलेक्ट्रिक पावर कॉर्पोरेशनचे (एनएचपीसी) मुख्य व्यवस्थापकीय संचालक आर. के. विश्नोई यांच्या हस्ते आणि जम्मू-काश्मीरचे प्रधान सचिव एच. राजेश प्रसाद; आर एच पी सी एल चे व्यवस्थापकीय संचालक आय. डी. दयाल, जम्मू आणि काश्मीर राज्य वीज विकास महामंडळ लिमिटेड (जेकेएसपीडीसी) चे संचालक पंकज मंगोत्रा,  एन एच पी सीचे संचालक आर एचपीसीएलचे  मुख्य कार्यकारी अधिकारी ए. के. नौरियाल आणि एनएचपीसीचे आणि जम्मू काश्मीर सरकारचे अधिकारी यांच्या उपस्थितीत झाले.

रटल जलविद्युत प्रकल्प हा रटल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेड (RHPCL) द्वारे कार्यान्वित केला जात असून तो नॅशनल हायड्रोइलेक्ट्रिक पॉवर कॉर्पोरेशन (एनएचपीसी) आणि जम्मू आणि काश्मीर राज्य वीज विकास महामंडळ लिमिटेड (जेकेएसपीडीसी) यांच्यात अनुक्रमे 51% आणि 49% भागीदारीसह स्थापन केला जात आहे. जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील चिनाब नदीवर 850 मेगावॅटची स्थापित क्षमता असलेला रटल जलविद्युत प्रकल्प आहे. भारत सरकारच्या एकूण 5281.94 कोटी रुपये गुंतवणूकीच्या या प्रकल्पाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या अर्थविषयक समितीने जानेवारी 2021मध्ये मंजुरी दिली.

Continue reading

जेन झेडच्या सहभागातून तयार होणार राज्याचे युवा धोरण

१३ ते ३५ वयोगटातील युवकांना (जेन झेड) जागतिकीकरणाच्या गतीशी संतुलितपणे जोडण्यासाठी आणि वैज्ञानिक दृष्टीकोन, वैविध्यतेचे ज्ञान, नागरिक कर्तव्ये व जबाबदाऱ्या याकडे लक्ष केंद्रीत करण्यासाठी राज्य सरकार सुधारित युवा धोरण तयार करत आहे. युवा धोरण अधिक प्रभावी करण्यासाठी युवकांना आपले...

आता रुग्णालयातल्या वस्त्रांची धुलाई होणार यांत्रिक पद्धतीने

राज्यातल्या ५९३ शासकीय रुग्णालयांमध्ये स्वच्छता, सुरक्षितता आणि निर्जंतुक सेवा अधिक बळकट करण्याच्या दृष्टीने तेथील वस्त्रे यांत्रिक पद्धतीने धुण्याच्या प्रक्रियेला आता सुरूवात झाली आहे. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते या वस्त्रधुलाई सेवेचा आज शुभारंभ झाला. मुंबईतल्या...

दिवाळीत आपत्कालीन स्थितीत संपर्क साधा १०१ व १९१६ क्रमांकांवर

दिवाळीत दीपोत्सव साजरा करताना मुंबईकरांनी पर्यावरणाचाही विचार करावा. फटाके उडविताना/फोडताना लहान मुलांची काळजी घ्यावी. फटाक्यांमुळे ध्वनी आणि वायूप्रदूषण होणार नाही, याबाबत दक्ष राहवे, असे आवाहन बृहन्मुंबई महापालिका आणि मुंबई अग्निशमन दलाने केले आहे. दुर्दैवाने आग किंवा तत्सम प्रसंग उद्भवल्यास...
Skip to content