Monday, October 28, 2024
Homeब्लॅक अँड व्हाईटबांधकाम व पाडकाम...

बांधकाम व पाडकाम कचऱ्याबाबत केंद्राची मार्गदर्शक तत्त्वे

बांधकाम आणि पाडकाम  कचरा हा जगातील सर्वात मोठा घनकचऱ्यांपैकी एक आहे. एका अंदाजानुसार भारतातील बांधकाम उद्योग दरवर्षी सुमारे 150-500 दशलक्ष टन बांधकाम आणि पाडकाम कचरा निर्माण करतो. यामुळे त्या कचऱ्याचे डंपिंग करणे तसेच विल्हेवाट लावण्यासाठी जागेचा अभाव हा प्रश्‍न आहेच आणि यामध्‍ये जैवविघटनशील कचऱ्याचे प्रमाण वाढविण्‍यासाठी कराव्या लागणाऱ्या मिश्रणाची अयोग्य पद्धत यासारखी अनेक आव्हाने समोर येतात. हा कचरा कमी करण्यासाठी आणि कचरा सामग्रीचा पुनर्वापर करण्यास मदत करणाऱ्या तंत्रज्ञानाला मोठी मागणी आहे. यादृष्टीने आता, आम्ही बांधकाम आणि पाडकाम कचरा, प्लास्टिक कचरा, ई-कचरा आणि जैव-धोकादायक कचरा यांच्यासह कचरा व्यवस्थापनाच्या इतर प्रकारांमध्ये विस्तृत मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, अशी माहिती केंद्रीय गृहनिर्माण मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी दिली.

“बांधकाम क्षेत्रात बांधकाम आणि पाडकाम  कचऱ्याचा पुनर्वापर आणि वापराविषयी अलिकड काळात घडलेला विकास” या विषयावरील राष्ट्रीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी पुरी बोलत होते. शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी सरकारच्या प्रयत्नांवर प्रकाश टाकताना हरदीप पुरी यांनी नमूद केले की, 2015मध्ये सुरू करण्यात आलेली शहरी मोहीम ही याची चांगली उदाहरणे आहेत. पायाभूत सुविधांची निर्मिती आणि सेवा वितरणाच्या शाश्वत पद्धतींचा अवलंब करण्याच्या सरकारच्या हरित दृष्टीकोनातून घनकचरा प्रक्रियेत 2014मध्ये केवळ 17% होती त्यामध्‍ये वाढ होऊन हे प्रमाण  2024 मध्ये 77%पेक्षा जास्त झाले आहे.

बांधकाम उद्योग हा भारतातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या उद्योगांपैकी एक आहे. त्याचबरोबर  देशात रोजगार देणारा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा उद्योग आहे. अर्थव्यवस्थेमध्‍ये 250 क्षेत्रांमध्ये ‘फॉरवर्ड’ आणि ‘बॅकवर्ड’ लिंकेज बांधकाम क्षेत्राला आहे. म्हणजे प्रत्यक्ष बांधकामाआधी अनेक कामे करावी लागतात तसेच विविध कामे इमारतीचे बांधकाम पूर्ण झाल्यावर करावी लागतात. 2025पर्यंत भारत जागतिक स्तरावर तिसऱ्या क्रमांकाची बांधकाम बाजारपेठ असेल, असा अंदाज आहे, असे ते म्हणाले.

भारताला 2030 पर्यंत दरवर्षी सुमारे 700-900 दशलक्ष चौरस मीटर व्यावसायिक आणि निवासी जागांची आवश्यकता असणार आहे. जर भारत 2047 पर्यंत विकसित देश बनवायचा असेल, तर त्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे हा घटक महत्त्वाचा असणार आहे. बांधकाम क्षेत्राशी निगडीत पर्यावरणाचा विचार करताना विशेषत: सी अॅंड डी म्हणजेच  बांधकाम आणि पाडकाम यांच्या कचऱ्याची विल्हेवाट, ही गोष्‍ट महत्त्वाची आहे. त्यामुळे वाढत्या बांधकाम क्रियाकलापांसह, बांधकाम आणि पाडकाम कचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी अधिक कार्यक्षम उपाय शोधणे अत्यावश्यक आहे, असेही पुरी यांनी सांगितले.

गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाने  बांधकाम आणि पाडकाम कचरा व्यवस्थापनाबाबत सर्व भागधारकांची मानसिकता बदलण्यासाठी केलेल्या प्रगतीवर बोलताना पुरी म्हणाले की, गृहनिर्माण मंत्रालयाने सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांना प्रत्येक प्रमुख शहर/नगरासाठी बांधकाम आणि पाडकाम कचरा निर्मितीचा डेटा-माहिती जमा करण्याची सूचना केली आहे.   बांधकाम आणि पाडकाम कचरा, स्त्रोतांच्या ठिकाणीच विलग करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे आणि हा कचरा संकलनासाठी संस्थात्मक यंत्रणा स्थापन करण्‍यात यावी.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content