माय व्हॉईस

राजीनाम्याची हूल देणाऱ्या ठाकरेंच्या आमदारकीला आज निरोप!

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर २०२२मध्ये शिंदेंबरोबर जाणाऱ्या शिवसेनेतल्या आमदारांना तसेच शिवसैनिकांना रोखण्याकरीता तेव्हाच्या अखंड शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा तसेच विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची भावनात्मक घोषणा केली. त्यानंतर ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र, विधान परिषदेतल्या आमदारकीचा राजीनामा खिशातून बाहेर काढलाच नाही. आता याच न दिलेल्या राजीनाम्याच्या आमदारकीची मुदत येत्या १३ मे रोजी संपणार आहे. त्याआधीचे त्यांचे विधान परिषदेचे हे अखेरचे अधिवेशन सध्या सुरू असून त्याचे शेवटच्या आठवड्याचे कामकाज चालू आहे. त्यामुळे आज विधान परिषद सभागृहाकडून त्यांना औपचारिक निरोप देण्यात येणार आहे. एका शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी...

पृथ्वीबाबांचा चळ!

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि कऱ्हाडचे माजी आमदार पृथ्वीराज चव्हाण हे काही फार थोर नेते नाहीत वा यशस्वी संसदपटूही नाहीत. पण स्वतःकडे प्रसिद्धी कशी खेचायची...

वरळीतल्या ‘सेंचुरी’तल्या महिला...

अगदी दोन दिवसांपूर्वीच नागरिकांनी आगामी महापालिका निवडणुकामध्ये राजकीय पक्षांना मतदान काय म्हणून करायचे, असा उद्विग्न प्रश्न विचारला होता. यावर अर्थात उलटसुलट प्रतिक्रिया आल्या. त्यांचे...

मुंबईत रस्त्यावरून सुरक्षितपणे...

सार्वजनिक वाहतुकीच्या क्षेत्रात गेल्या काही वर्षांत पायाभूत सेवासुविधांची लक्षणीय भर पडल्याने मुंबई महानगराचा चेहरामोहरा पार बदलून गेला आहे यात शंका नाही. 2014पूर्वीच्या काळात महाराष्ट्र...

सीएसएमटी परिसराला आहे...

काल दुपार-संध्याकाळच्या सुमारास लोकलने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वेस्थानकाकडे (सीएसएमटी) निघालो असताना मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण आदी महापालिका निवडणुकांची घोषणा झाली. तब्बल चार वर्षानंतर...

ठाकरेसाहेब, बरे झाले...

महाराष्ट्र विधिमंडळाचे छोटेखानी अधिवेशन नागपूरमध्ये नुकतेच पार पडले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या अधिवेशनात फार काही होईल अशी अपेक्षा कोणी बाळगलेलीही नव्हती....

काय मिळाले विधिमंडळाच्या...

राज्य विधिमंडळाचे आठवड्याभराचे छोटेखानी अधिवेशन नागपुरात पार पडले. विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर महायुतीच्या नव्या राजवटीतील देवेन्द्र  फडणवीस सरकारचे हे दुसरे हिवाळी अधिवेशन. मागील वर्षी हे...

उद्धव ठाकरेंचा सरकारविरोध...

राज्य सरकारला सत्तेवर येऊन नुकतेच एक वर्ष झाले. या वर्षपूर्तीनिमित्त सरकारचीच बाजू जनतेसमोर आली. मात्र वर्षपूर्ती होताना सरकारवर तुटून पडणारे विरोधी पक्ष सुस्त दिसले....

तपोवन आंदोलन मुख्यमंत्री...

नाशिक येथील कुंभमेळ्यासाठी साधूग्राम वसवण्यासाठी तपोवन भागातील वृक्ष तोडणार असल्याच्या चर्चेने आता प्रत्येकजण आपली राजकीय पोळी भाजून घेत आहे. मुख्य म्हणजे सत्ताधारी महायुतीतच आता ह्यावरून...

कोकणात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांच्या...

एका घरगुती समारंभानिमित्त गेल्या आठवड्यात कोकणात जायचे होते. आधी मला वाटले की महाराष्ट्र शासनाची अधिस्वीकृती आहे, लगेचच आरक्षण, तिकीट मिळेल. माझा फुगा लगेचच फुटला....
Skip to content