एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर २०२२मध्ये शिंदेंबरोबर जाणाऱ्या शिवसेनेतल्या आमदारांना तसेच शिवसैनिकांना रोखण्याकरीता तेव्हाच्या अखंड शिवसेनेचे पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा तसेच विधान परिषदेच्या आमदारकीचा राजीनामा देत असल्याची भावनात्मक घोषणा केली. त्यानंतर ठाकरे यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मात्र, विधान परिषदेतल्या आमदारकीचा राजीनामा खिशातून बाहेर काढलाच नाही. आता याच न दिलेल्या राजीनाम्याच्या आमदारकीची मुदत येत्या १३ मे रोजी संपणार आहे. त्याआधीचे त्यांचे विधान परिषदेचे हे अखेरचे अधिवेशन सध्या सुरू असून त्याचे शेवटच्या आठवड्याचे कामकाज चालू आहे. त्यामुळे आज विधान परिषद सभागृहाकडून त्यांना औपचारिक निरोप देण्यात येणार आहे.
एका शिवसैनिकाला मुख्यमंत्रीपदी...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी भेट देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक वेगळीच राजकीय चाल खेळली आहे. विधानसभा निवडणुकीच्या अनपेक्षित निकालानंतर...
महाराष्ट्राचे राजकारण कोणत्या स्तराला जाणार याची चिंता बदमाश राजकारण्यांना नसली तरी ती सामान्य मराठी माणसांना नक्कीच आहे. गेल्या दहा वर्षांत तर महाराष्ट्रातील राजकारणाने टोक...
अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांचे खरे रूप जगाला दाखवायला सुरुवात केली आहे. जगभरातील जे लोक अमेरिकेत बेकायदा राहतात त्यांना मायदेशी परत पाठवण्याचे...
धन्य ते गुरू आणि शिष्य! भारताचे पहिले सिनिअर रँग्लर, मुर्डी गावचे सुपुत्र रघुनाथ परांजपे यांनी १९३८ साली यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात एक शाळा...
राजधानी दिल्ली नेमकी कोणाची यासाठी उद्या मतदान होत असून दिल्ली जिंकली तरीही आम आदमी पार्टीचे प्रमुख संयोजक, माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल मात्र मुख्यमंत्री होणार...
दिवसाचे चोवीस तास निवडणुकांचा विचार करणाऱ्या नेत्यांच्या हातात देश आहे, याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वातील भाजपाप्रणित रालोआचे तिसरे सरकार...
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सलग आठवा अर्थसंकल्प काल लोकसभेत सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारचा तिसऱ्या टर्ममधील हा पहिला पूर्ण वर्षाचा अर्थसंकल्प आहे....
अडीच वर्षांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरे यांचे दरबारी राजकारण संपेल असे वाटत होते. परंतु लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पुन्हा दरबारी राजकारण सुरू...
कोकणाला निसर्गाचे वरदान आहे, असे सांगत अनेकांनी गुंतवणुका करण्यास कधीचीच सुरुवात केली आहे. पण या गुंतवणुकांचे आर्थिक तसेच व्यावहारिक भवितव्य काय आहे, निसर्गाच्या समतोलावर...