मुंबईची सांस्कृतिक ओळख असलेल्या काळा घोडा कला महोत्सवात यंदा कलेसोबतच सामाजिक व आर्थिक सक्षमीकरणाचा आदर्श पाहायला मिळाला. मुंबई महापालिकेच्या पुढाकाराने सहभागी झालेल्या १८ नोंदणीकृत महिला बचत गटांनी ९ दिवसांत ८ लाख ५४ हजार ५०० रुपयांच्या साहित्याची विक्री करून स्वयंरोजगाराच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकले. मुंबईत ३१ जानेवारी ते ८ फेब्रुवारी या कालावधीत आयोजित काळा घोडा कला महोत्सवाला हजारो नागरिक व देश-विदेशातील पर्यटकांनी भेट दिली. या संधीचा लाभ घेत पालिकेने आपल्या कार्यक्षेत्रातील महिला बचत गटांना उत्पादने प्रदर्शित व विक्रीसाठी स्वतंत्र व्यासपीठ उपलब्ध करून दिले. यात महिला व तृतीयपंथी सदस्यांनी तयार...
मुंबई महापालिकेच्या संगणकीय कामकाज अद्ययावत करण्यात येत असल्याने सध्या बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे येत्या २१ जुलैपर्यंत ऑनलाईन पद्धतीने होणारी विवाह नोंदणी होणार नाही....
शैक्षणिक कारणांसाठी, नोकरीसाठी तसेच टोकियो ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी विदेशी जाणाऱ्या व्यक्तींना आता आठवड्यातील सोमवार ते शनिवार अशा सहापैकी कोणत्याही दिवशी, महानगरपालिकेने नेमून दिलेल्या ७...
राज्यातील खाद्यसंस्कृती आणि पाककलेला चालना देणे तसेच या माध्यमातून देश-विदेशातील पर्यटकांना महाराष्ट्राकडे आकर्षित करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र राज्य पर्यटन संचालनालयाच्या वतीने ‘महाराष्ट्राचे मास्टरशेफ’ या रेसिपी स्पर्धेचे ऑनलाईन पद्धतीने आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती पर्यटन संचालक डॉ. धनंजय सावळकर यांनी दिली.
स्पर्धेतील 15 सर्वोत्कृष्ट रेसिपींना प्रत्येकी 10 हजार रुपये, 40 रेसीपींना प्रत्येकी 5 हजार रुपये तर उत्कृष्ट 100 रेसिपींना प्रत्येकी 2 हजार रुपयांची बक्षिसे दिली जातील. शिवाय स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्व स्पर्धकांना महाराष्ट्र पर्यटन संचालनालयाकडून सहभागाचे प्रमाणपत्र दिले जाणार आहे. स्पर्धेत सहभागासाठी www.maharashtratourism.gov.in या संकेतस्थळावर इत्यंभूत माहिती उपलब्ध आहे. https://bit.ly/MaharashtracheMasterchef या लिंकवर माहिती तसेच अर्ज उपलब्ध आहे.
महाराष्ट्राची खाद्यसंस्कृती ही देश आणि जगभरात लोकप्रिय आहे. राज्याच्या विविध भागातील मालवणी, आग्री-कोळी, खान्देशी, कोल्हापुरी,...
सध्या सुरू असलेल्या कोविड साथरोगामुळे सर्वसामान्य मुंबईकरांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. अशा परिस्थितीत मुंबईकरांवर अग्निशमन वार्षिक सेवा शुल्कासारख्या नवीन शुल्काची आकारणी करणे...
महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन ५ आणि ६ जुलै, २०२१ रोजी विधान भवन, मुंबई येथे आयोजित करण्यात आले असून विधान भवनाच्या प्रवेशाकरीता कोरोना म्हणजेच कोविड-१९...
सुमारे दीड फूट लांबीची सळई छातीतून आरपार गेलेल्या एका महिलेवर मुंबई महापालिकेच्या सायन हॉस्पिटलमध्ये नुकतीच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. सलग तीन तास एक अत्यंत...
मुंबईतल्या प्रसिद्ध श्री महालक्ष्मी मंदिराजवळच्या एका बहुमजली वाहनतळाच्या प्रवेशद्वारावर असणाऱ्या एका भव्य पोलादी ‘प्लेट’वर एक कार उभी केली जाते. पार्किंगच्या प्रवेशद्वाराजवळ असणाऱ्या रिसेप्शन काऊंटरवर...
मुंबईतल्या शीव (सायन) परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयास (सायन हॉस्पिटल) सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ‘क्लास–१’ प्रकारातील २ अत्याधुनिक अतिदक्षता...
मुंबई महापालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपैकी एक महत्त्वाचा तलाव असणारा पवई तलाव आज, १२ जून २०२१ रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला आहे.
हाच...