जलवाहिनीच्या दुरूस्तीसाठी आज, गुरूवारी रात्रीपासून उद्या शुक्रवारी रात्रीपर्यंत मुंबईतल्या जी दक्षिण व जी उत्तर विभागातील काही परिसरात (दादर-प्रभादेवी भागात) पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे.
लोअर परळ परिसरातील १,४५० मिलीमीटर व्यासाची तानसा मुख्य जलवाहिनी दुरूस्तीचे काम आज रात्री १० वाजल्यापासून उद्या, शुक्रवारी रात्री ८ वाजेदरम्यान हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे या २२ तासांच्या कालावधीत जी दक्षिण आणि जी उत्तर विभागातील काही परिसरांचा पाणीपुरवठा पूर्णत: तर काही ठिकाणी अंशत: बंद राहणार आहे.
या विभागात आहे पाणीपुरवठा बंद
जी दक्षिण विभागः करी रोड,...
मुंबईत म्हाडातर्फे विक्रीसाठी खुल्या करण्यात आलेल्या ३७० सदनिकांच्या (घरांच्या) किंमतीत १० ते २५ टक्के घट करतानाच याकरीता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येत्या १९ सप्टेंबरपर्यंत मुदवाढ...
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी फिल्मी जगतातला आपला जनसंपर्क (पीआर) चालूच ठेवला आहे. कालच त्यांनी मुंबईत आभिनेते व चित्रपट निर्माते राकेश रोशन...
बृहन्मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील मुंबई नगर पथविक्रेत्यांची १ शिखर समिती आणि ७ परिमंडळाच्या प्रत्येकी एक याप्रमाणे (७ समिती) एकूण ८ समित्यांसाठी गुरुवारी, २९ ऑगस्टला निवडणूक...
मुंबईतल्या होमगार्ड उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी तसेच मैदानी चाचणी पुढे ढकलण्यात आली आहे. नोंदणी केलेल्या उमेदवारांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे आवाहन समादेशक, होमगार्ड बृहन्मुंबई तथा पोलीस...
कोलकाता येथे एखाद्या सैतानालाही लाजवेल अशी बलात्काराची घटना घडूनही या बलात्काऱ्यांच्या विरोधात राहुल गांधी, प्रियांका गांधी, शरद पवार, सुप्रिया सुळे, अखिलेश यादव, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, असदुद्दीन ओवैसी ही इंडी आघाडीची...
महायुती सरकरच्या 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या महिला मोर्चातर्फे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना राज्यातील 25 लाख महिला रक्षाबंधनाच्या दिवशी राख्या पाठवणार आहेत,...
मुंबईतील प्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिरात येणाऱ्या भाविकांना उत्कृष्ट दर्जाच्या सोयीसुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी श्री सिद्धीविनायक सुशोभिकरणासाठी मुंबई महापालिकेमार्फत पाचशे कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार...
उत्तर प्रदेशातल्या जौनपूरमधून भारतीय जनता पार्टीकडून खासदारकी मिळविण्यात अपयशी ठरलेले महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री कृपाशंकर सिंह पुन्हा महाराष्ट्रात सक्रिय झाले आहेत. विधानसभेच्या येत्या निवडणुकीतही आपल्या...
मुंबईतल्या किनारी रस्त्याचे म्हणजेच कोस्टल रोडचे काम विहित वेळेत होण्याची शक्यता मावळली असून या प्रकल्पावर काम करणाऱ्या लार्सन अँड टुब्रो कंपनीने काम पूर्ण करण्याकरीता...