आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेच्या (आयएमओ) परिषदेत भारताची श्रेणी 'ब'मध्ये फेरनिवड झाली आहे. यात, आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारात सर्वाधिक रस असलेल्या 10 देशांचा समावेश आहे. लंडनमधल्या 34व्या आयएमओ असेम्ब्लीत नुकत्याच झालेल्या निवडणुकीत भारताने या श्रेणीत सर्वाधिक मते मिळवली. 169 वैध मतांपैकी 154 मते मिळवण्यात भारताला यश आले.
केंद्रीय बंदरे आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी हा निकाल भारताच्या वाढत्या जागतिक सागरी प्रभावाला मिळालेले मोठे समर्थन असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केलेल्या इंडिया मेरीटाईम वीकच्या यशस्वी आयोजनानंतर लगेचच भारताची फेरनिवड झाली आहे. यात 100हून अधिक देशांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. भारताच्या विकसित होत असलेल्या सागरी क्षमता यात प्रदर्शित झाल्या होत्या. या कार्यक्रमाने गुंतवणूक, तंत्रज्ञानाचा अवलंब, बंदरप्रणित विकास...
चित्रपटांची पायरसी केली जाते हे अनेकांना ठाऊक आहे. पण आता पाठ्यपुस्तकांचीही पायरसी केली जाते आणि तीही कोट्यवधींची, हेही उघड झाले आहे. एनसीईआरटीच्या पायरेटेड पाठ्यपुस्तकांची...
भारतातील मोबाईल पेमेंट व वित्तीय सेवा व्यासपीठ पेटीएम (Paytm) आता करभरणा, बजेट नियोजन किंवा एक्सेलआधारित खर्च ट्रॅकिंगसाठी युपीआय स्टेटमेंट सहज डाऊनलोड करण्याची सुविधा देते....
भारतातील परंपरासंपन्न दागिन्यांच्या ब्रँडपैकी एक असलेल्या वामन हरी पेठे ज्वेलर्स यांनी २०२५च्या कान्स चित्रपट महोत्सवात आपल्या दागिन्यांच्या राजेशाही तेजाने जागतिक स्तरावर उपस्थितांचे लक्ष वेधून...
दुहेरी ऑलिंपिक पदकविजेता भालाफेकपटू आणि जागतिक क्रीडा आयकॉन नीरज चोप्रा याने जर्मन ऑटोमोटिव्ह उत्पादक ऑडीसोबत भागीदारी केली आहे. याबाबतची घोषणा करताना जेएसडब्ल्यू स्पोर्ट्सने सांगितले...
रोमन कॅथोलिक ख्रिश्चन समाजाचे सर्वोच्च धर्मगुरू पोप फ्रन्सिस यांचे २१ एप्रिलला वयाच्या ८८व्या वर्षी निधन झाले. काल रोममधल्या व्हॅटिकन सिटीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात...
आयटेलने त्यांचा नवीन पॉवरहाऊस ‘ए९५ ५जी' लाँच केला आहे. हा स्मार्टफोन टिकाऊपणा, विश्वसनीय कार्यक्षमता आणि अत्यंत गतीशील कनेक्टिव्हीटीची मागणी करणाऱ्या वापरकर्त्यांसाठी डिझाईन करण्यात आला...
भारताच्या मध्य तसेच पूर्व भागाला गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने अक्षरशः झोडपून काढले असून गेल्या दोन दिवसांत बिहारमध्ये ८२ जणांचा मृत्यू झाल्याचे बोलले जाते....
भारताच्या तीनही सैन्य दलांतील (भूदल, नौदल आणि वायूदल) महिलांच्या 'समुद्र प्रदक्षिणा' या मुंबई ते सेशेल्स आणि पुन्हा मूळ ठिकाणी परत अशा सागरी परिक्रमा मोहिमेला...
रेल्वे प्रवाशांचे हरवलेले किंवा चोरीला गेलेले मोबाईल फोन ब्लॉक करणे, त्यांचा माग काढणे आणि ते परत मिळवण्यासाठी दूरसंचार विभाग आणि रेल्वे सुरक्षा दल यांच्यात...