डेली पल्स

मंत्रालयातल्या दुसऱ्या पंतांचे (पंतबाळेकुंद्री) निधन, आज अन्त्यसंस्कार

महाराष्ट्र शासनाच्या मंत्रालयाच्या नगरविकास विभागातून सहसचिव म्हणून निवृत्त झालेले नामवंत अधिकारी गो. श्री. पंतबाळेकुंद्री यांचे काल, सोमवारी ठाण्यात निधन झाले. ते 89 वर्षांचे होते. त्यांच्यामागे पत्नी, पुत्र अभिजीत आणि विवाहित कन्या तसेच नातवंडे असा परिवार आहे. पंत यांच्या पार्थिवावर आज मंगळवारी, सकाळी अकरा वाजता ठाण्यातच येथे अंत्यसंस्कार करण्यात येतील. एकेकाळी मंत्रालयात दोन पंत प्रसिद्ध होते. एक म्हणजे मुख्यमंत्री मनोहर जोशी तर दुसरे म्हणजे पंतबाळेकुंद्री. मनोहर जोशी यांचे 23 फेब्रुवारी 2024 रोजी निधन झाले. त्यानंतर काल पंतबाळेकुंद्री निवर्तले. मंत्रालयात नगरविकासासंबंधी कोणताही मुद्दा उपस्थित झाला किंवा चर्चा झाली की सर्वांचा प्रतिसाद एकसुरी...

सुनेत्रावहिनींनी लुटला क्रिकेटचा...

महाराष्ट्राच्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज आंबेगावमध्ये प्रचारदौऱ्यावर असताना लेक विस्टा सोसायटीच्या आवारात क्रिकेटचा आनंद लुटताना चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली. रविवार...

युपीएससीच्या परिक्षेत सारथीचे...

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा स्पर्धा परीक्षा २०२३चा (युपीएससी) अंतिम निकाल नुकताच जाहीर झाला. यात पुण्यातल्या सारथी संस्थेमार्फत मुलाखतीसाठी प्रायोजित ४५ विद्यार्थ्यांपैकी २० विद्यार्थ्यांची...

तटरक्षक दलाने केली...

भारतीय तटरक्षक दलाने काल कर्नाटकातील कारवारजवळच्या समुद्रात अंदाजे 215 सागरी मैल अंतरावर इंजिनमध्ये बिघाड झाल्यामुळे संकटात सापडलेल्या आयएफबी रोझरी, या भारतीय मासेमारी नौकेची यशस्वीपणे सुटका...

उद्या श्रीराम नवमी!...

श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या तिथीला नेहमीपेक्षा 1 हजार पटीने कार्यरत असलेल्या श्रीरामतत्त्वाचा लाभ मिळण्यासाठी ‘श्रीराम जय राम जय...

काँग्रेसनेच डॉ. आंबेडकरांना...

मोदी सरकार पुन्हा सत्तेत आले तर देशाचे संविधान बदलणार असा अपप्रचार विरोधकांकडून सुरू आहे. मात्र कुणी कितीही  प्रयत्न केले तरीही ते अशक्य असल्याचे खुद्द...

कल्याणमध्ये सीए इन्स्टिट्यूटला...

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) संस्थेला सीए इन्स्टिट्यूटसाठी कल्याणमध्ये सरकारकडून जागा उपलब्ध झाली असून या १७ गुंठे जागेत सुसज्ज असं सीए इन्स्टिट्यूट...

चैत्यभूमी सजत आहे..

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मुंबई महापालिकेच्या जी उत्तर विभागाच्या उद्यान विभागामार्फत दादरच्या चैत्यभूमी येथे सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी...

भावी पोलीस उपनिरीक्षकांची...

लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तसेच कायदा व सुव्यवस्था सांभाळण्याकरिता मनुष्यबळ आवश्यक असल्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने मुख्य परीक्षा - २०२२मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या...

देशात ३३८ ठिकाणी...

हिंदू नववर्षाच्या निमित्ताने काल महाराष्ट्र मंदिर महासंघ, हिंदु जनजागृती समिती, मंदिरांचे विश्वस्त, पुजारी, हिंदुत्वनिष्ट संघटना आणि धर्मप्रेमी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्र, कर्नाटक, गोवा आणि उत्तर...
Skip to content