Homeडेली पल्ससुनेत्रावहिनींनी लुटला क्रिकेटचा...

सुनेत्रावहिनींनी लुटला क्रिकेटचा आनंद..

महाराष्ट्राच्या बारामती लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज आंबेगावमध्ये प्रचारदौऱ्यावर असताना लेक विस्टा सोसायटीच्या आवारात क्रिकेटचा आनंद लुटताना चौकार आणि षटकारांची आतषबाजी केली.

रविवार असल्यामुळे सर्व नागरिक क्रिकेट खेळण्याचा आनंद घेत होते. त्याचवेळी सुनेत्रावहिनी प्रचारासाठी तेथे पोहोचल्या. तेव्हा तिथल्या सर्व नागरिकांनी त्यांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह केला. त्याही नागरिकांच्या आग्रहाला मान देत चक्क बॅट घेऊन क्रिकेटच्या मैदानात उतरल्या व विजयाचे चौकार व षटकार लगावले. महायुतीच्या उमेदवाराला प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहनही त्यांनी केले.

आंबेगावमधील प्रतिष्ठित अशी मानली जाणाऱ्या विंडसर प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रावहिनींच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी खेळाडूंशी सुनेत्रावहिनींनी आपुलकीचा संवाद साधला. यावेळी मैदानावर क्रिकेटप्रेमींकडून महायुतीचा विजय असो, सुनेत्रावहिनी आगे बढो.. हम तुम्हारे साथ है, अशा घोषणा देत सर्व खेळाडू महायुतीसोबत असल्याचा विश्वास दिला. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

Continue reading

श्रीवर्धनमधले ठाकरेंचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंच्या हाती घड्याळ

श्रीवर्धनमधील शिवसेनेच्या ठाकरे गटाचे माजी आमदार तुकाराम सुर्वेंनी आज मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. १६ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर सुर्वे तुम्ही माझ्यासोबत येत आहात. हा आज माझ्या आयुष्यातील सुवर्णयोग आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल...

AIमुळे साखरेच्या उताऱ्यात 20% तर ऊस उत्पादनात 30% वाढ!

AI तंत्रज्ञानामुळे ऊस उत्पादनात 30% वाढ आणि साखरेच्या उताऱ्यात 20% वाढ यशस्वीपणे साधता आली आहे. शिवाय, पीकवाढीचा कालावधी 6 महिने कमी झाला आहे. बारामती कृषी विज्ञान केंद्र आणि ॲग्रीकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या प्रक्षेत्रावर हा AI आधारित ऊस शेतीचा प्रयोग करण्यात...

आयातुल्लाह खामेनेईंची होणार सद्दामसारखी अवस्था?

इराण आणि इस्रायल संघर्षात आता अमेरिकेने उडी घेतली आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाजमाध्यमावर एक पोस्ट करत म्हटले आहे की, इराणने बिनशर्त शरणागती पत्करावी. इराणच्या आकाशावर आमचे नियंत्रण आहे. इराणचे सर्वेसर्वा कुठे आहेत हे आम्हाला ठाऊक आहे. आम्हाला...
Skip to content