कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. २०२४-२५साठी घोषित होणाऱ्या वाड्मयीन पुरस्कारासाठी साहित्य मागविण्यात येत आहे. हे सर्व पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या सभासद असणाऱ्या लेखकांसाठी आहेत. इच्छुकांनी पुरस्कारासाठी आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती ३० नोव्हेंबर २०२५पूर्वी, माधव विश्वनाथ अंकलगे, केंद्रीय कार्यवाह - कोमसाप, कवी केशवसुत स्मारक संकुल, मालगुंड पो. मालगुंड, ता. जि. रत्नागिरी- ४१५६१५ याठिकाणी पाठवावेत, असे आवाहन करण्यात आले आहे.
या पुरस्कारांमध्ये प्रथम श्रेणीचे बारा पुरस्कार, द्वितीय श्रेणीचे पाच, विशेष श्रेणीचे तीन पुरस्कार आणि वाड्मयेतर बारा पुरस्कार दिले जाणार असून, यापैकी...
मुंबईतले बोरिवली हे नवरात्रोत्सवासाठी खूप प्रसिद्ध आहे. बोरिवली येथील कोरा केंद्र मैदानावर दुर्गादेवी नवरात्र उत्सव समितीतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या "भक्तिरास नवरात्र महोत्सव 2024"साठी भूमिपूजन,...
मुंबईतल्या पश्चिम महामार्गावर खेरवाडीजवळ असलेला जवळजवळ अर्धा किलोमीटरचा नाला अलीकडे नव्याने बंद करण्यात आला. या नाल्यावर मुंबई महापालिकेचे उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली...
श्रीकांत चषक आंतर शालेय-कॉलेज कॅरम स्पर्धा जिंकण्यासाठी ज्युनियर ४८ कॅरमपटूमध्ये उद्या, १४ सप्टेंबर रोजी मुंबईत कांदिवली-पूर्व येथे चुरस होणार आहे. श्रीकांत स्पोर्ट्स क्लब-कांदिवली व...
बँक ऑफ बडोदा या भारतातील आघाडीच्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेने विलेपार्ले, मुंबई येथे फिजिटल शाखेचे नुकतेच उद्घाटन केले. फिजिटल शाखा ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी स्वयं-सेवा आणि सहाय्यक सेवा मॉडेल्स एकत्रित करून ग्राहकांच्या अनुभवाची पुनर्परिभाषित करेल. देशात सुरू झालेली बँकेची ही तिसरी फिजिटल शाखा आहे.
बँक ऑफ बडोदाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी देबदत्त चंद यांनी बँक ऑफ बडोदाचे कार्यकारी संचालक संजय व्ही. मुदलियार यांच्या उपस्थितीत या फिजिटल शाखेचे
उद्घाटन केले. बँक ऑफ बडोदाचे महाव्यवस्थापक मनीष कौरा, सुनीलकुमार शर्मा, महाव्यवस्थापक आणि झोनल हेड, मुंबई झोन, वरिष्ठ बँक अधिकारी आणि झोन आणि विभागातील कर्मचारी सदस्य आणि ग्राहकदेखील उद्घाटनावेळी उपस्थित होते.
बँक ऑफ बडोदाची फिजिटल शाखा व्हिडिओ संपर्क केंद्राने सुसज्ज आहे जिथे ग्राहक गैर-आर्थिक सेवांवर सहाय्य मिळवण्यासाठी व्हिडिओ कॉलद्वारे बँकेच्या संपर्क केंद्राशी कनेक्ट होऊ शकतो. यात एकसेल्फ सर्व्हिस कियोस्क आहे जिथे टॅबलेट स्थापित केले जातात आणि ग्राहक पॅन नंबर अपडेट, ईमेलद्वारेखाते विवरण, टीडीएस प्रमाणपत्र इत्यादीसारख्या सेवांचा लाभ घेऊ शकतात. फिजिटल शाखेत एक विशेष सेवा क्षेत्र तसेच युनिव्हर्सल सर्व्हिस काउंटरदेखील आहेत जेथे अखंड ग्राहकसेवा मिळते. देशभरात प्रायोगिक तत्त्वावर अशाच प्रकारच्या फिजिटल शाखा सुरू करण्याचे बँकेचे लक्ष्य आहे. फिजिटल शाखा ही अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज आहे.
येत्या १६ ते २४ सप्टेंबर दरम्यान कर्नाल, हरियाणा येथे होणाऱ्या १९ वर्षांखालील ज्युनियर राष्ट्रीय बुद्धिबळ स्पर्धेसाठी मुंबईतल्या भांडूपच्या अवघ्या १४ वर्षीय, नववीत शिकत असलेल्या...
पॉवरलिफ्टिंग स्पोर्ट्स असोसिएशनच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय रायगड बेंचप्रेस, क्लासिक आणि इक्विप या स्पर्धेत नंदिनी उमप, अमृता भगत, श्रेयश जाधव, तन्मय पाटील, गणेश तोटे,...
श्री गणेश आखाड्यामध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य तथा जिल्हा क्रीडा परिषद ठाणे व मिरा भाईंदर महानगर पालिका आयोजित २०२४-२५च्या जिल्हास्तरीय शालेय...
मुंबई शहर जिल्हा ज्युनियरआणि २३ वर्षांखालील वार्षिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२४ या स्पर्धेत दादरच्या श्री समर्थ व्यायाम मंदिराच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली. त्यांच्या खेळाडूंनी ४...
बॅडमिंटन असोसिएशन मुंबई उपनगरच्या वतीने नुकत्याच गोरेगाव स्पोर्ट्स क्लब येथे 10 वर्षे वयोगटावरील दुहेरीच्या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. त्यामध्ये आनंद विठ्ठलकर व बाळकृष्ण पी. एम. यांनी...