Monday, October 28, 2024
Homeटॉप स्टोरीनारायण राणेंची खासदारकी...

नारायण राणेंची खासदारकी रद्द करा!

रत्नागिरी-सिंधुदूर्ग लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीचे नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गांचा वापर करत विजय मिळवला आहे. त्यामुळे त्यांची निवड रद्द करावी व त्यांच्यावर ५ वर्षे निवडणूक लढविण्यापासून आणि मतदान करण्यापासून बंदी घालावी, अशा आशयाची कायदेशीर नोटीस शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार विनायक राऊत यांनी निवडणुक आयोगाला पाठवली आहे. अ‍ॅड. असीम सरोदे, अ‍ॅड. किशोर वरक ,अ‍ॅड. श्रीया आवले यांच्यामार्फत त्यांनी ही नोटीस पाठवल्याचे समजते.

निवडणूक प्रचाराचा कालावधी ०५/०५/२०२४ रोजी संपलेला असतानाही भाजपा कार्यकर्ते ०६/०५/२०२४ रोजीसुद्धा नारायण राणे यांचा प्रचार करीत होते. नारायण राणेसमर्थक प्रचार संपलेला असतानाही ई.व्ही.एम. मशीन दाखवून राणेंनाच मत द्या, असे सांगून मतदारांना पैसे देत असल्याचे व्हिडिओ सर्वत्र प्रसारित झाल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे.

नारायण राणे यांचे पुत्र आमदार नितेश राणे यांनी जाहीर सभा घेऊन मतदारांना धमकावले की, जर राणेंना मतदान केले नाही, त्यांना लीड मिळाली नाही तर आमच्याकडे निधी मागायला यायचे आहे. लीड मिळाली नाही तर तुम्हाला निधीसुद्धा मिळणार नाही. १३ एप्रिलला रोजी झालेल्या सभेत नितीश राणे यांनी ही धमकी दिल्याचा उल्लेख नोटीसमध्ये करण्यात आला आहे.

राणे

निवडणूक आचारसंहितेचा नारायण राणे, नितेश राणे आणि भाजप कार्यकर्त्यांनी भंग केला आहे. त्यामुळे लोकशाहीची फसवणूक करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या विजयाची निवडणूक आयोगाने चौकशी करावी अशी विनंती विनायक राऊत यांनी या कायदेशीर नोटिसामार्फत केली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने सात दिवसात या नोटीसवर उत्तर द्यावे अशी अपेक्षा आहे. भ्रष्टाचाराचा वापर करून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या निवडून येण्याला उच्च न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून आव्हान करण्यात येईल असे माजी खासदार विनायक राऊत म्हणाले.

अनेक ठिकाणी मोकळ्या व पारदर्शक वातावरणात मतदान व मतमोजणी झाली नाही. निवडक पद्धतीने भ्रष्टाचार करू देणे, भाजपाच्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार व बेकायदेशीरतेकडे दुर्लक्ष करणे असे प्रकार काही निवडणूक निर्णय अधिकार्‍यांच्या मदतीने करण्यात आले हे वास्तव लोकशाही यंत्रणेचा गैरवापर दाखविणारे आहेत व त्याबाबत नागरिक म्हणून भारतावर प्रेम करणार्‍या प्रत्येकाने चिंता व्यक्त करावी अशी परिस्थिती असल्याचे अ‍ॅड. असीम सरोदे म्हणाले.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content