Homeचिट चॅटरविवारी ठाण्यात रंगणार...

रविवारी ठाण्यात रंगणार ब्रीज स्पर्धा

आर्य क्रीडा मंडळ व ठाणे जिल्हा ब्रीज असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या रविवारी, दि. २४ डिसेंबर २०२३ रोजी ब्रीज स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. आर्य क्रीडा मंडळ, गावदेवी, ठाणे (प) येथे ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा पेअर्स पद्धतीने खेळविण्यात येणार आहे.

ही स्पर्धा दोन सत्रांमध्ये खेळविण्यात येईल. २४ डिसेंबर रोजी सकाळी नऊ वाजता उद्घाटनाने पहिल्या सत्राने या स्पर्धेला सुरूवात होईल. तर दुपारी दोन वाजता दुसऱ्या सत्राची सुरूवात होईल. स्पर्धेतील विजेत्यांना आकर्षक पारितोषिक दिले जाईल. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी व सहभागी होण्यासाठी अनिरूद्ध संझगिरी– ९८१९२६७४५७ अथवा शरद गोरे– ९८३३७४९५३५ यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.

चीनमध्ये झाली होती एशियन ब्रीज स्पर्धा

चीनमध्ये २७ सप्टेंबर ते ०६ ऑक्टोबरदरम्यान एशियन देशांसाठी विविध खेळांचे आयोजन करण्यात आले. यात ब्रीज खेळाचाही समावेश होता. ठाणे जिल्हा ब्रीज असोसिएशन संस्थेचे नामवंत खेळाडू राजू तोलानी आणि अजय खरे यांनी एशियन ब्रीज स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करत रौप्य पदकाची कमाई केली. त्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content