Wednesday, February 5, 2025
Homeएनसर्कलमरीन ड्राईव्हवर झाली...

मरीन ड्राईव्हवर झाली हवाई दलाची चित्तथरारक प्रात्यक्षिके!

भारतीय हवाई दलाने नुकतीच मुंबईतील मरीन ड्राइव्ह येथे हवाई प्रात्यक्षिकांसह विविध उपक्रमांचा जनसंपर्क कार्यक्रम आयोजित केला होता. हवाई दलाबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि भारतीय हवाई दल आणि स्थानिक समुदाय यांच्यातील संबंध अधिक दृढ करणे हा या जनसंपर्क कार्यक्रमाचा प्राथमिक उद्देश होता. हवाई दलाची कौशल्ये, क्षमता प्रदर्शित करणे, भारतीय हवाई दलाबद्दल जागरूकता निर्माण करणे आणि तरुणांना भारतीय हवाईदल करिअर म्हणून निवडण्यास प्रोत्साहित करणे हादेखील या कार्यक्रमाचा उद्देश होता. हा कार्यक्रम महाराष्ट्र सरकारच्या समन्वयाने आयोजित करण्यात आला होता.

नयनरम्य मरिन ड्राइव्हवर मुंबईकर भारतीय हवाई दलाच्या हवाई प्रात्यक्षिकांचे साक्षीदार झाले. अनेक हवाई तळांवरून उड्डाण करणारी  विमाने या प्रात्यक्षिकांमध्ये  सहभागी झाली होती. महाराष्ट्राचे  राज्यपाल रमेश बैस हे प्रमुख पाहुणे म्हणून यावेळी उपस्थित होते. अनेक नागरी आणि लष्करी मान्यवरही या कार्यक्रमात सहभागी झाले आणि हवाई प्रात्यक्षिकांचे साक्षीदार झाले.

हवाई कसरतींमध्ये  भारतीय हवाई दलाच्या प्रात्यक्षिक चमूचा समावेश होता. गिरगाव चौपाटीवर एएन -32मधून आकाशगंगा चमूच्या हवाई योद्ध्यांनी स्कायडायव्हिंग म्हणजेच विमानातून जमिनीच्या दिशेने उडी मारत अचूक पद्धतीने उतरून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सूर्यकिरण चमूच्या  प्रभावी हवाई प्रात्यक्षिकांनीही उपस्थितांना खिळवून ठेवले. सुखोई -30 एमकेआय  आणि सारंग हेलिकॉप्टरच्या कालबद्ध आणि समक्रमित प्रात्यक्षिकांनी भारतीय हवाई दलाची उत्कृष्टता  प्रदर्शित केली.

Continue reading

‘इंद्रायणी’चे ३०० भाग झाले प्रदर्शित!

कलर्स मराठीवरील ‘इंद्रायणी’ मालिकेने प्रेक्षकांच्या मनात एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. इंदूचे कीर्तन, तिचे निरागस प्रश्न, आंनदीबाई आणि तिच्यातील संघर्ष, इंदूचे मार्गदर्शक म्हणजेच व्यंकू महाराजांनी तिला दिलेली शिकवण, तिला शिकवलेले आदर्श सगळंच रसिकांच्या मनाला भिडणारं आहे. आजवर मालिकेत...

पुराणिक स्मृती क्रिकेटः वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी, एमआयजीची आगेकूच

मुंबईतल्या माहीम ज्युवेनाईल स्पोर्ट्स क्लब व शिवाजी पार्क जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झालेल्या क्रिकेटपटू प्रकाश पुराणिक स्मृती चषक महिला टी-२० क्रिकेट स्पर्धेत दिलीप वेंगसरकर फाउंडेशन, राजावाडी क्रिकेट क्लब, एमआयजी क्रिकेट क्लब संघांनी सलामीचे सामने जिंकले. सलामी फलंदाज पूनम राऊत (३९...

चेंबूरमध्ये शुक्रवार-शनिवार मराठी साहित्य संमेलन

मराठी साहित्य रसिक मंडळ चेंबूर आणि ना. ग. आचार्य व दा.कृ. मराठे महाविद्यालय, चेंबूर यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या शुक्रवारी ७ व शनिवारी ८ फेब्रुवारीला दुपारी ३ ते ७ या वेळेत मराठी साहित्य संमेलन आयोजित केले आहे. या संमेलनात प्रसिद्ध लेखिका प्रतिभा सराफ...
Skip to content