सफाळ्यातील अचानक मित्र मंडळाच्यावतीने येत्या ८ डिसेंबर रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता पालघर जिल्ह्यातील सफाळे येथे, सफाळे श्री २०२४ शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
मिथुन पाटील या स्पर्धेचे आयोजक आहेत. पालघर डिस्ट्रीक्ट बॉडी बिल्डिंग असोसिएशनने या स्पर्धेला मान्यता दिली आहे. सफाळे (पू.) येथील पंडितवाडीमध्ये ही स्पर्धा होईल. अधिक माहितीसाठी मिथुन पाटील यांच्याशी 99756 64886 किंवा 87880 65903 क्रमांकावर संपर्क करावा.