Sunday, April 27, 2025
Homeचिट चॅट११ ऑगस्टला बीओबी...

११ ऑगस्टला बीओबी कप बुद्धिबळ स्पर्धा   

मुंबईतल्या आयडियल स्पोर्ट्स एकॅडमीतर्फे स्वातंत्र्य दिनानिमित्त बँक ऑफ बडोदा-मुंबई विभाग प्रायोजित बीओबी कप ६/७/८/९/१०/११/१२/१४ वर्षांखालील मुला-मुलींची बुध्दिबळ स्पर्धा ११ ऑगस्टला आरएमएमएस सभागृह, परळ, मुंबई-१२ येथे आयोजित करण्यात येणार आहे.

आयडियल ग्रुप, आरएमएमएस व मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटना  सहकार्याने ही स्पर्धा स्विस लीग पद्धतीने खेळविण्यात येणार आहे. बँक ऑफ बडोदा-मुंबई विभागाच्या सौजन्याने विजेत्या-उपविजेत्यांना एकूण १२० पुरस्कार दिले जाणार आहेत. प्रत्येक वयोगटात  किमान चार साखळी फेऱ्यांमधील प्रत्येक फेरी १५-१५ मिनिटे अधिक ३ सेकंद इन्क्रिमेंटची राहील. प्रत्येक वयोगटातील पहिल्या १० मुलांना व पहिल्या ५ मुलींना बीओबी कपचा पुरस्कार दिला जाईल. सर्व सामने जिंकणाऱ्या लहान वयोगटातील विजेत्यास क्रीडाप्रेमी सुरेश आचरेकर स्मृती विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती आयडियल स्पोर्ट्स एकॅडमीचे कार्याध्यक्ष गोविंदराव मोहिते यांनी दिली.

संयोजकांतर्फे बुद्धिबळपट, घड्याळ आदी साहित्य पुरविण्यात येणार आहे. स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्या खेळाडूंनी प्रवेशअर्जासाठी अथवा अधिक माहितीसाठी संयोजक लीलाधर चव्हाण अथवा मुंबई शहर जिल्हा बुद्धिबळ संघटनेचे सेक्रेटरी राजाबाबू गजेंगी (व्हॉटसअॅप क्रमांक ९३२४७ १९२९९) यांच्याशी ७ ऑगस्टपर्यंत संर्पक‌ साधावा.

Continue reading

श्री मावळी मंडळच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात

ठाण्याच्या श्री मावळी मंडळ संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ७२व्या राज्यस्तरीय पुरुष व महिला गटाच्या कबड्डी स्पर्धेला आजपासून सुरूवात होत आहे. २९ एप्रिलपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेचे उद्घाटन आज सायंकाळी ७ वाजता खासदार नरेश म्हस्के यांच्या हस्ते होणार आहे. विशेष...

पोप फ्रान्सिस यांच्या अंत्यसंस्कारानिमित्त उद्या भारतात शासकीय दुखवटा

पोप फ्रान्सिस यांच्या पार्थिवावर उद्या, शनिवारी 26 एप्रिलला अंत्यसंस्कार केले जातील. त्यानिमित्त उद्या देशभरात शासकीय दुखवटा पाळला जाईल. उद्या संपूर्ण भारतात नियमितपणे राष्ट्रध्वज फडकवला जाणाऱ्या इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर उतरवला जाईल तसेच कोणताही अधिकृत मनोरंजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाणार नाही....

के. एस. चित्रा यांचं ‘तुझ्या प्रेमाची साथ मिळता..’ प्रदर्शित!

प्रेमाच्या रंगांनी सजलेलं एक नवीन रोमॅंटिक गाणं आता प्रेक्षकांच्या भेटीला आलंय. पद्माराज नायर लिखित आणि दिग्दर्शित "माझी प्रारतना" ह्या चित्रपटाचं पहिलं गाणं प्रदर्शित झालय. या गाण्यात स्वतः पद्माराज आणि अनुषा अडेपचा रोमँटिक अंदाज दिसत आहे. या दोघा कलाकारांना आपण...
Skip to content