Homeटॉप स्टोरीमुंबईत भाजपाला मिळाली...

मुंबईत भाजपाला मिळाली सुमारे २२ टक्के मते

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या गुरूवारी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत एकूण २२७ जागांपैकी ८९ जागा जिंकत भारतीय जनता पार्टी (भाजपा) सर्वाधिक प्रभावी ठरली. भाजपाने ८९ जागांवर विजय मिळवत एकूण ११,७९,२७३ मते प्राप्त केली. एकूण मतदानाच्या तुलनेत भाजपाच्या मतांचा वाटा २१.५८ टक्के असून, विजयी उमेदवारांना मिळालेल्या एकूण मतांपैकी तब्बल ४५.२२ टक्के मते भाजपाकडे गेली आहेत.

दुसऱ्या क्रमांकावर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राहिली. या पक्षाने ६५ जागा जिंकत ७,१७,७३६ मते मिळवली. एकूण मतदानात त्यांचा वाटा १३.१३ टक्के असून विजयी मतांपैकी २७.५२ टक्के मते या पक्षाला मिळाली. शिवसेनेने २९ जागा जिंकत २,७३,३२६ मते मिळवली. मतदानातील त्यांचा एकूण वाटा ५ टक्के असून, विजयी मतांमध्ये त्यांचा हिस्सा १०.४८ टक्के आहे. काँग्रेसने २४ जागांवर यश मिळवत २,४२,६४६ मते मिळवली. काँग्रेसचा एकूण मतदानातील वाटा ४.४४ टक्के तर विजयी मतांमध्ये ९.३१ टक्के आहे. याशिवाय ऑल इंडिया एमआयएम (मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन) या पक्षाला ८ जागा आणि ६८,०७२ मते मिळाली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला (मनसे) ६ जागा आणि ७४,९४६ मते मिळाली. राष्ट्रवादी काँग्रेसला ३ जागा आणि २४,६९१ मते, समाजवादी पार्टीला २ जागा आणि १५,१६२ मते, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद्चंद्र पवार)ला १ जागा आणि ११,७६० मते प्राप्त झाली.

एकूण २२७ विजयी उमेदवारांना २६,०७,६१२ मते मिळाली असून, हे प्रमाण एकूण मतदानाच्या ४७.७२ टक्के इतके आहे. महत्त्वाची बाब म्हणजे संपूर्ण मुंबईत एकूण मतदान ५४,६४,४१२ इतके झाले. ११,६७७ मते बाद ठरली.

Continue reading

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...

केशव उपाध्ये भाजपाचे प्रदेश उपाध्यक्ष तर डावखरे, राणे सरचिटणीस!

भारतीय जनता पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष म्हणून अतुल काळसेकर, भारती पवार, संजय कोडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकुरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी प्रदेश सरचिटणीस म्हणून आमदार निरंजन डावखरे, योगेश सागर, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश...
Skip to content