Homeचिट चॅटअमर शेंडेलिखित नाना...

अमर शेंडेलिखित नाना शंकरशेठ यांचे चरित्र शैक्षणिक अभ्यासक्रमात

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ, मुंबईच्या कला शाखेच्या (द्वितीय वर्ष) अभ्यासक्रमासाठी फलटण येथील तरुण लेखक, साहित्यिक, चरित्र अभ्यासक अमर शेंडे यांनी लिहिलेल्या व महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांनी प्रकाशित केलेल्या मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ तथा नाना शंकरशेठ यांच्या चरित्राची निवड झाली असल्याची माहिती विद्यापीठाच्या अधिष्ठाता डॉ. सौमित्रा सावंत यांनी दिली आहे.

डॉ. होमी भाभा राज्य विद्यापीठ हे मुंबईतील शंभर वर्षांपेक्षा जास्त इतिहास असणाऱ्या व पूर्वी मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या एल्फिन्स्टन कॉलेज, सिडनहॅम कॉलेज, सेकंडरी ट्रेनिंग कॉलेज आणि द इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, या महाविद्यालयांचे एकत्रित सार्वजनिक संशोधन विद्यापीठ असून या विद्यापीठाची स्थापना सन २०१९मध्ये करण्यात आलेली आहे. मुंबईच्या शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, जडणघडणीमध्ये या ऐतिहासिक वारसा असणाऱ्या महाविद्यालयांचे योगदान मोलाचे आहे. या महाविद्यालयांमधून मुंबईच्या शिल्पकाराचे अर्थात नाना शंकरशेट यांचे चरित्र विद्यार्थ्यांना अभ्यासता येणार आहे.

अमर शेंडे महाराष्ट्र साहित्य परिषद शाखेचे कार्यवाह असून गेली वीस वर्षे साहित्य क्षेत्रात कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांच्या यशवंतराव चव्हाण विचारधन एक सुवर्ण ठेवा, या पुस्तकाची हैदराबाद येथील राजा राममोहन रॉय ग्रंथालय, कोलकाता व महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथ भेट योजनेसाठी निवड झाली होती. तसेच मराठी वृत्तपत्र सृष्टीचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्यावरील त्यांच्या बाळशास्त्री, या चरित्राची दखल यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई यांनी घेतलेली आहे. तसेच अमर शेंडे यांच्या साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल पुणे येथील प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मानाने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.

त्यांच्या या चरित्र ग्रंथाच्या निवडीबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत, कुलसचिव विलास पाध्ये, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे, सदस्य रवींद्र बेडकीहाळ, सचिव डॉ. मीनाक्षी पाटील, ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी, एल्फिन्स्टन महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. सौमित्रा  सावंत, विज्ञान संस्थेचे संचालक डॉ. श्रीनिवास कुलकर्णी, सिडनहॅम महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. श्रीनिवास धुरे, शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रा. सुविधा सरवणकर, न्यायसहाय्यक विज्ञान संस्थेच्या संचालक प्रा. वंदना कांबळे, दैवज्ञ समाजोन्नती परिषदेचे अध्यक्ष डॉ. गजानन रत्नपारखी, नाना शंकरशेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुरेंद्र शंकरशेट, सरचिटणीस अॅड. मनमोहन चोणकर व दैसपचे सरचिटणीस चंद्रशेखर दाभोळकर, एल्फिन्स्टनचे प्रा. बाळासाहेब खोमणे, साहित्य मंडळाचे प्रपाठक रामेश्वर रोकडे यांनी अमर शेंडे यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

Continue reading

आखाती युद्धामुळे महागाईचा भडका उडण्याची भीती!

इस्त्राईलने साउथ पार्स गॅस फील्डवर केलेल्या हल्ल्याने आणि इराणने कतारच्या रास लफान केंद्रावर केलेल्या पलटहल्ल्याने भारतासाठी ऊर्जासंकट एकाचवेळी दोन आघाड्यांवर उभे ठाकले आहे. गॅस, इंधन, महागाई साखळी धोक्यात येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यातून भारतासह जगभरात महागाईचा भडका...

आखाती देशांमध्ये उद्या साजरी होणार ईद!

संयुक्त अरब अमिराती (UAE), सौदी अरेबिया, कुवेत, कतार आणि बहरीनसह अनेक आखाती देशांनी ईद-उल-फित्रच्या अधिकृत प्रारंभ तारखेची आज घोषणा केली. 30 दिवसांचा रमजान महिना पूर्ण झाल्याचे दर्शवणारा शव्वाल महिन्याचा चंद्र न दिसल्यामुळे, उद्या 20 मार्च, शुक्रवार रोजी ईद-उल-फित्र साजरी...

आज गुढीपाडवा! या करा धार्मिक कृती!!

आज गुढीपाडवा. कुठलाही सण आला की त्या त्या सणाच्या वैशिष्ट्याप्रमाणे आणि आपल्या पद्धतीप्रमाणे आपण काहीतरी करीतच असतो. मात्र धर्मात सांगितलेल्या अशा पारंपरिक कृतींमागील अध्यात्मशास्त्र लक्षात घेतल्यास त्याचे महत्त्व आपल्याला पटते. गुढीपाडव्याच्या दिवशी केल्या जाणार्‍या धार्मिक कृतींची ही घ्या माहिती.. अभ्यंगस्नान...
Skip to content