Saturday, October 26, 2024
Homeचिट चॅटमंगळवारपासून प्रो कबड्डीला...

मंगळवारपासून प्रो कबड्डीला साजेसे चढाई-पकडींचे द्वंद्व! 

प्रो कबड्डीचा चढाई-पकडींचा खेळ थांबताच आता मुंबईतल्या प्रभादेवीच्या स्वामी समर्थ क्रीडा मंडळाच्या राजाभाऊ देसाई स्मृतीचषक कबड्डी स्पर्धेच्या निमित्ताने १४ अव्वल व्यावसायिक संघांची प्रो कबड्डीला साजेशी चढाओढ पाहायला मिळणार आहे. येत्या मंगळवारी, ५ मार्चपासून ८ मार्चदरम्यान विशेष व्यावसायिक पुरूष गट कबड्डी संघाचा जोरदार संघर्ष कबड्डीप्रेमींना अनुभवायला मिळेल.

कबड्डीला प्रो कबड्डीची श्रीमंती लाभण्यापूर्वी कबड्डी आणि कबड्डीपटूंना मान आणि सन्मान मिळवून देताना दिमाखदार स्पर्धांचे आयोजन करणार्‍या ८० वर्षांच्या “तरुण तडफदार” स्वामी समर्थ क्रीडा मंडळाने पुन्हा एकदा विशेष व्यावसायिक गट स्पर्धेचे आयोजन केले आहे. यंदाही मंडळाच्या विशेष व्यावसायिक स्पर्धेत गतविजेता भारत पेट्रोलियम, इन्शुअरकोट स्पोर्टस् (युवा पलटन), युनियन बँक, मुंबई महानगर पालिका, बँक ऑफ बडोदा, महिंद्रा आणि महिंद्रा, रिझर्व्ह बँक, मिडलाईन अ‍ॅकॅडमी, मुंबई पोर्ट ट्रस्ट अशा बलाढ्य संघांचा दमदार खेळ चवन्नी गल्लीत उभारलेल्या सीताराम चव्हाण क्रीडानगरीतील एका मॅटच्या मैदानावर अनुभवता येईल.

आगळ्या वेगळ्या बक्षीसांचाही वर्षाव

कबड्डी संघ आणि कबड्डीपटूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून मंडळाने काही हटके बक्षीसेही ठेवली आहेत. यात एकाच चढाईत पाच गुण टिपणारा, सुपर रेडदरम्यान चढाईपटूची दोघांतच यशस्वी पकड करणारे पकडवीर, सामना सुरु होताच पाच मिनीटात प्रतिस्पर्ध्यावर लोण चढवणारा संघ, तसेच एका सामन्यात चढाईचे १५ गुण मिळविणारा चढाईबहाद्दर आणि पकडींचे ७ गुण टिपणारा पकडवीर यांना मंडळाच्या वतीने आकर्षक बक्षिस दिले जाणार असल्याची घोषणा मंडळाचे प्रमुख कार्यवाह महेश सावंत यांनी केली.

या स्पर्धेचे वैशिष्ट्यं म्हणजे आपल्या जोरदार चढाया-पकडींनी कबड्डी चाहत्यांना आपल्या प्रेमात पाडणारे कबड्डीचे अनेक सुपरस्टार प्रभादेवीच्या मॅटवर आपला सुसाट आणि भन्नाट खेळ करताना दिसतील. कबड्डीचे ग्लॅमर वाढेल असे आयोजन करताना मंडळाने विजेत्या संघाला लक्षाधीश करणार असल्याचे जाहीर केले आहे. उपविजेता संघालाही पाऊण लाख आणि चषक दिला जाणार आहे. एवढेच नव्हे तर उपांत्य सामन्यात पराभूत झालेले संघही २१ हजार रुपयांची कमाई करणार असल्याची माहिती सावंत यांनी दिली. स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडूही सोनसाखळी जिंकेल तर चढाई आणि पकडवीरालाही सोन्याची भेटवस्तू दिली जाणार आहे.

स्पर्धेत एकंदर १४ बलाढ्य संघ खेळणार असून तीन-तीन संघांचे दोन तर चार-चार संघांचे दोन-दोन गट खेळविले जातील. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्यपूर्व फेरीसाठी एकमेकांशी भिडतील. स्पर्धा अधिक रंजक आणि थरारक व्हावी म्हणून एकाच मॅटवर खेळविली जाणार असून प्रत्येक दिवशी सहा सामने खेळविले जाणार असल्याची माहिती मंडळाचे क्रीडाप्रमुख रवी शिंदे यांनी दिली.

कबड्डी स्पर्धेत सहभागी संघ

बँक ऑफ इंडिया, मुंबई पोर्ट ट्रस्ट (एमपीटी), भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (बीपीसीएल), रिझर्व्ह बँक (आरबीआय), मुंबई महानगरपालिका (एमसीजीएम), अ‍ॅग्रीकल्चर प्रोड्युसर मार्केट कमिटी (एपीएमसी), युनियन बँक (युबीआय), आयएसपीएल (युवा पलटण), मिडलाईन अ‍ॅकेडमी, संत सोपान सहकारी बँक, न्यू इंडिया ॲश्युरंस, जे एस डब्ल्यू, महिंद्रा आणि महिंद्रा.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content