16 ते 26 फेब्रुवारीदरम्यान भारत रंग महोत्सव

नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, राष्ट्रीय नाट्य विद्यालयाच्या (एनएसडी) वतीने येत्या 16 ते 26 फेब्रुवारीदरम्यान 22व्या भारत रंग महोत्सव (बीआरएम), 2023चे आयोजन करण्यात आले आहे. दिल्ली, जयपूर, राजमुंद्री, रांची, गुवाहाटी, जम्मू, श्रीनगर, भोपाळ, नाशिक आणि केवडिया येथे हा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय नाट्य महोत्सव होणार आहे. 26 फेब्रुवारी रोजी केवडिया येथे समारोप सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

नाटके आणि सांस्कृतिक कलाविष्कार, जागतिक दृष्टिकोनातून रंगभूमीच्या जागतिक आणि धोरणात्मक महत्त्वाच्या अनेक विषयांवर आधारित परिसंवाद यांचा 22व्या भारत रंग महोत्सवात समावेश असेल. नाटकांच्या सादरीकरणासाठी विविध राज्यांतील संस्थांचे सहकार्य घेण्यात आले आहे. यात स्थानिक कलाकारांचा सहभाग असेल आणि नाट्यकृती स्थानिक लोकांना आकर्षित करतील हे या माध्यमातून सुनिश्चित केले जाईल.

नाटकांसोबतच पुस्तकांचे प्रकाशन, दिग्दर्शक संमेलन, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आणि नाट्य क्षेत्रातील दिग्गजांचा मास्टर क्लास असे इतरही संलग्न उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

अन्य देशांशी आंतरराष्ट्रीय संबंध आणि सांस्कृतिक विनिमय कार्यक्रम दृढ करणे हे भारत रंग महोत्सवाचे उद्दिष्ट आहे. देशभरातील नाट्यपरंपरेबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी हा महोत्सव एक व्यासपीठ निर्माण करतो. केवळ कलाकारच नाही तर दिग्गज दिग्दर्शकही या भव्य महोत्सवात सहभागी होणार आहेत.

Continue reading

इराणचे प्रमुख खामेनेई ठार, पुत्र मोजतबा उत्तराधिकारी!

गेल्या काही दिवसांपासून तोंडी असलेला अमेरिका-इराण संघर्ष आता प्रत्यक्षात उतरला. काल सकाळी अमेरिका आणि इस्त्रायलने संयुक्त कारवाई करत इराणच्या सर्व प्रमुख ठिकाणांवर बॉम्बहल्ले केले. इराणच्या सहा शहरांवर हल्ले करण्यात आले. यात इराणचे प्रमुख नेते तसेच परमाणू केंद्रांना लक्ष्य करण्यात...

स्वप्न पाहा व त्यांचा पाठलाग करा, हीच यशाची गुरूकिल्ली!

छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि त्या स्वप्नांचा पाठलाग केला तेव्हा स्वराज्य अवतरले. म्हणून स्वप्न पाहा, ध्येय निश्चित करा आणि त्यांचा पाठलाग करा तरच ते प्रत्यक्षात येईल, अशा शब्दांत शिवचरित्राचे गाढे अभ्यासक शिवभक्त राजू देसाई यांनी शिवरायांच्या...

आरंभ स्पोर्ट्स मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद

मुंबईत आरंभ स्पोर्ट्सतर्फे आयोजित करण्यात आलेल्या चौथ्या मल्लखांब स्पर्धेला खेळाडूंचा जोरदार प्रतिसाद मिळाला. मोरया मित्र मंडळ मैदान, कांदिवली (पश्चिम) येथे झालेल्या या स्पर्धेत मुंबई उपनगरातील ३० संस्थांमधून ४५०पेक्षा जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा आरंभ स्पोर्ट्स व मोरया...
Skip to content