Homeहेल्थ इज वेल्थज्येष्ठ नागरिकांनो, कोविडपासून...

ज्येष्ठ नागरिकांनो, कोविडपासून सावधान!

महाराष्ट्रात सध्या कोविड तसेच एच३एन२ डोके वर काढत असून याला सामोरे जाण्यासाठी नागरिकांनी, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी मास्कचा वापर करावा. याशिवाय त्यांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना सावधानता बाळगावी, असे आवाहन राज्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले आहे.

मुंबईत सध्या कोविड व एच३एन२चे रूग्ण मोठ्या संख्येने वाढत असून मुंबई महानगरपालिका आपल्या परीने प्रयत्न करीत आहेत. मात्र कोविडसंदर्भात टेस्टिंग, ट्रॅकिंग आणि ट्रेसिंग ही त्रिसूत्री तसेच कोविड रुग्ण आयसोलेशन व क्वारंटाईन पाळली जात नाही. तसेच मुंबईकरांच्या मनात कोविडची भीती राहिली नसल्याने अपेक्षित कोविड अट्रीब्युटेड बिहेव्हियर ते पाळत नाहीत. या पार्श्वभूमीवर डॉ. दीपक सावंत यांनी मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांची नुकतीच भेट घेऊन महत्त्वाच्या सूचना केल्या.

कोविड व एच३एन२ संदर्भात आपण बैठक बोलवावी अशी विनंती त्यांनी पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांच्याकडे केली होती. त्यांनी अतिरिक्त आयुक्तांना ही बैठक आयोजित करावी अशी सूचना दिली होती. यावेळी पालिका उपायुक्त रणजित ढाकणे, उपायुक्त विश्वास शंकरवार, के पूर्वचे सहाय्यक आयुक्त मनीष वळुंज, एच पश्चिमचे विनायक विसपुते, के पश्चिमचे सहाय्यक आयुक्त डॉ. पृथ्वीराज चव्हाण, आर मध्यच्या संध्या नांदेडकर आदी उपस्थित होते.

लसीकरणाची टक्केवारी घसरली असून बूस्टर डोस घेण्यासाठी नागरिक तयार नाहीत. लसीकरणाचे फायदे व त्याची परिणामकारकता ६/८ महिनेच राहू शकते. त्यामुळे वॅक्सिन घेणे आवश्यक आहे. प्रसिद्धीमाध्यमातून वॅक्सिनचा तुटवडा असल्याचे डॅा. सावंत यांनी लक्षात आणून दिले असता आपण वॅक्सिनचा पुरवठा करण्यासाठी केंद्राकडे मागणी केली असे डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले. वॅक्सिनशिवाय ज्येष्ठ नागरिक, सहव्याधी असलेले लोक यांना संसर्गापासून दूर ठेवणे कठीण आहे. तसेच एच३एन२साठी बायोफायर टेस्ट सेव्हन हिल्स येथे सुरू करण्यासाठी १ कोटी रूपयांची गरज आहे. तो निधी महानगरपालिकेने लवकर उपलब्ध करून द्यावा. इतर रूग्णालयांतही ही सुविधा उपलब्ध करावी अशी आग्रही मागणी डॉ. सावंत यांनी या बैठकीत केली.

Continue reading

आशाताईंना देशभरातून भावपूर्ण श्रद्धांजली

ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्या निधनाची बातमी पसरताच देशभरातून शोकसंदेशांचा गहिवर लोटला. राष्ट्रपती भवनापासून ते सामान्य चाहत्यांपर्यंत, आणि मुंबईच्या गल्लीबोळांपासून ते आखाती देशांतील रेस्तराँपर्यंत, सर्वांनीच या महान स्वराला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आशाताई रुग्णालयात दाखल...

आशाताईंवर आज संध्याकाळी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

भारतीय संगीतसृष्टीतील एका युगाचा रविवारी अंत झाला. दादासाहेब फाळके पुरस्कार आणि पद्मविभूषण सन्मानाने गौरवलेल्या, जगातील सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे मुंबईत निधन झाले. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, बहुअवयव निकामी (मल्टी-ऑर्गन फेल्युअर) होऊन त्यांचे...

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...
Skip to content