Homeचिट चॅटबेस्टने स्वतःच्या मालकीच्या...

बेस्टने स्वतःच्या मालकीच्या बसेस घ्याव्यात!

मुंबई महापालिकेचा उपक्रम असलेल्या बेस्ट प्रशासनाने कंत्राटी बसेस घेण्याऐवजी स्वतःच्या मालकीच्या बसेस घ्याव्यात, अशी मागणी बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांची भेट घेऊन केली.

बेस्टची बससेवा अधिक लोकाभिमुख कशी करता येईल याविषयी चर्चा करण्यासाठी कामगार सेनेच्या प्रतिनिधी मंडळाने आमदार ठाकरे यांची खास भेट मातोश्री मुक्कामी घेतली होती. कंत्राटी बसेसमुळे कंत्राटदारांचा फायदा होतो. बेस्ट मात्र तोट्यात जात आहे, ही बाब निदर्शनास आणून अध्यक्ष सामंत यांनी बेस्ट उपक्रमाने सुमारे 3050 बसेस तातडीने खरेदी करण्याची गरज असल्याचे सांगितले. अर्थात ही खरेदी टप्याटप्याने केली जावी तसेच यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारने भरीव मदत करण्याची गरज असल्याचेही त्यांनी नमूद केले.

बेस्ट

केंद्र सरकारच्या शहर वाहतुकीसाठीच्या विविध योजनांचा मुंबई शहरालाही लाभ मिळाला पाहिजे. याबरोबरच कायम कर्मचाऱ्यांची भरती, रखडलेली पदोन्नतीची कामे, वेतन कराराची थकबाकी तसेच ग्रॅज्युइटीसाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत आदित्य ठाकरे यांनी महापालिका प्रशासन व राज्य सरकारकडे पाठपुरावा करावा, अशी मागणीही प्रतिनिधी मंडळाने केली. यात संघटनेचे माजी अध्यक्ष आशिष चेंबूरकर, उमेश सारंग, गणेश शिंदे आदी उपस्थित होते.

बेस्ट वाचली पाहिजे आणि ही सेवा अधिक उत्तम करता यावी म्हणून जे जे करावे लागेल ते मी जरूर करेन, असे आश्वासन आमदार आदित्य ठाकरे यांनी यावेळी दिले.

Continue reading

भारताचा इराणबरोबर सौदा? वैद्यकीय मदतीच्या मोबदल्यात जहाजे??

युद्धाने होरपळलेल्या इराणला भारताने मानवतावादी मदतीचा हात पुढे केला आहे. इराणमधील भारतीय दूतावासाने जाहीर केले की, भारताकडून आलेली वैद्यकीय साहित्याची पहिली खेप इराण रेड क्रेसेंट सोसायटीकडे सुपूर्द करण्यात आली आहे. इराणने भारताच्या या मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत सांगितले, "भारताच्या...

न्यायालयच म्हणते- ‘मेलेला’ खटला ‘जगवणे’ आमचे काम नाही!

मुंबई उच्च न्यायालयाने दिवाणी न्यायशास्त्रात एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे- दिवाणी न्यायालय सीपीसीच्या कलम 151 अंतर्गत आपल्या अंतर्भूत अधिकारांचा वापर करून एखादा खटला 'निरर्थक' (Infructuous) म्हणून फेटाळू शकते, जेव्हा त्यानंतरच्या घडामोडींमुळे मूळ वाद कारण (Cause of Action) अस्तित्त्वातच राहत...

भारत-पाक-अफगाणिस्तानच्या डोक्यावर हजार किमीचा असामान्य पाऊसपट्टा!

भारत, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानवर सध्या एक अत्यंत दुर्मिळ आणि शक्तिशाली हवामानप्रणाली सक्रिय झाली आहे. तब्बल एक हजार किलोमीटर लांबीचा एक सलग पाऊसपट्टा या तीन देशांवर पसरला असून हवामानतज्ज्ञांनी याला अत्यंत असामान्य घटना म्हणून संबोधले आहे. साधारणपणे अशा हवामानप्रणाली वक्राकार...
Skip to content