Homeब्लॅक अँड व्हाईटबसवराज पाटील, रश्मी बागल...

बसवराज पाटील, रश्मी बागल यांचा भाजपात प्रवेश

महाराष्ट्राचे माजी राज्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष बसवराज पाटील, सोलापूर जिल्ह्यातील रश्मी बागल, मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिग्विजय बागल यांच्यासह राज्यातील विविध पक्षांतील असंख्य नेते व कार्यकर्त्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी या सर्वांचे स्वागत केले. बसवराज पाटील, रश्मी बागल यासारख्या नेत्यांमुळे भारतीय जनता पार्टी आणखी मजबूत होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाला केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा, खा. सुधाकर शृंगारे, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, आ. अभिमन्यू पवार, आ. रमेश कराड, आ. राणा जगजितसिंह पाटील, आ. रणजितसिंह मोहिते पाटील, राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील, भाजपा प्रदेश सरचिटणीस माधवी नाईक, महिला मोर्चा प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ आदी उपस्थित होते.         

उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली विकसित भारत घडविण्याच्या संकल्पात हातभार लावण्याच्या उद्देशाने भारतीय जनता पार्टीत अनेकजण प्रवेश करीत आहेत. विकासाच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याच्या इच्छेनेच बसवराज पाटील यांच्यासारखं जुनं, जाणतं आणि सुसंस्कृत नेतृत्त्व भाजपात सहभागी झालं आहे. बसवराज पाटील, रश्मी बागल यांच्यासारखे नेते कोणत्याही अपेक्षेने पक्षात आलेले नाहीत. त्यांच्याकडून समाजहिताच्या ज्या मागण्या मांडल्या जातील त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू, असेही त्यांनी नमूद केले.

प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यावेळी म्हणाले की, अनेक वर्षे काँग्रेसचे काम निष्ठेने केलेल्या बसवराज पाटील यांच्यासारख्या नेत्यालाही देशाचा विकास नरेंद्र मोदी यांचे नेतृत्त्वच करू शकेल याची खात्री वाटत आहे. ”मोदी की गॅरंटी”वर विश्वास ठेवूनच समाजातील विविध घटकांतील नेते कार्यकर्ते भाजपामध्ये प्रवेश करत आहेत.

आपण ४० वर्षे प्रामाणिकपणे आणि निष्ठेने काँग्रेस पक्षासाठी काम केले. त्याच निष्ठेने आपण भारतीय जनता पार्टीसाठी काम करू, असे मनोगत बसवराज पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाच्या संकल्प पत्रासाठी सामान्य जनतेकडून सूचना मागविण्याच्या अभियानाचा प्रारंभ प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते करण्यात आला. ”उबाठा”मधून भाजपामध्ये आलेल्या राम गावडे यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर लिहिलेल्या जननायक या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. 

Continue reading

युरोपातल्या युद्धाची वाढती तीव्रता जगासाठी तापदायक!

गेल्या 24 तासांत जगभरात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर तणाव वाढला आहे. एकीकडे भू-राजकीय संघर्ष तीव्र होत असताना, दुसरीकडे जागतिक अर्थव्यवस्थेतील बदल आणि हवामान बदलाच्या गंभीर इशाऱ्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. युरोपमधील युद्धाची तीव्रता, पूर्व...

सूर्यवंशी क्षत्रिय समाज क्रिकेट स्पर्धा 18 नोव्हेंबरपासून

मुंबईच्या सूर्यवंशी क्षत्रिय ज्ञाती समाजाच्यावतीने सीझन क्रिकेटची एस के सी एल टी-२० स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या लीगमध्ये सहा संघ भाग घेत आहेत. 18 नोव्हेंबरला या स्पर्धेची सुरुवात होणार असून अंतिम सामना 28 नोव्हेंबर रोजी खेळवला जाईल. 196...

मुंबई विमानतळावर 17.18 कोटींचे कोकेन जप्त

महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागीय युनिटने, मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर काल एन्टेबे (युगांडा) येथून आलेल्या एका टांझानियन महिला प्रवाशाकडून 1718 ग्रॅम कोकेन जप्त केले. जप्त केलेल्या कोकेनची आंतरराष्ट्रीय बाजारातील अंदाजे किंमत 17.18 कोटी रुपये आहे. मिळालेल्या विशिष्ट माहितीच्या...
Skip to content