Wednesday, October 30, 2024
Homeकल्चर +मुलांसाठी ‘बर्फाची राणी’...

मुलांसाठी ‘बर्फाची राणी’ मंगळवारी मराठी ओटीटीवर!

पृथ्वीतलावर जगत असताना काय चांगलं आणि काय वाईट ही समजूत कोवळ्या वयात जर मुलांच्या अंगी आली, तर माणसाची माणुसकी पृथ्वीवर कायम टिकून राहिल. म्हणूनच पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म आणि बाल दिवसाचं औचित्य साधून १४ नोव्हेंबर २०२३ रोजी लहान मुलांना माणूसपण शिकवणारा हॉलिवूडचा अॅनिमेटेड चित्रपट ‘बर्फाची राणी’ अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर येत आहे.

चित्रपटाची कथा एका मोठ्या राज्यातील राजा, जादूगर आणि बर्फात बंदिस्त झालेली शापित राणी यांच्या भोवती फिरते. गेर्डा ही एका सामान्य जादूगाराच्या घरात जन्मलेली असामान्य मुलगी आहे, जिला तूर्तास तिच्यात असणाऱ्या जादुई कौशल्याचे ज्ञान नाही. राजाने राज्यातील सर्व जादूगारांना धनाचे आमिष दाखवून बर्फाच्या राणीच्या जगात बंदिस्त केले आहे, जिथून कोणीही परत येऊ शकत नाही. त्यात गेर्डाचे आई वडील आणि भाऊही आहे. गेर्डा आपल्या कुटुंबाला सोडवण्यात यशस्वी होईल का? हे चित्रपटात कळणार आहे.

“पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या स्मरणार्थ आणि बाल दिवसानिमित्त बालकांना मनोरंजनासोबतच माणूस म्हणून जगण्याची चांगली शिकवण देणारा चित्रपट ‘बर्फाची राणी’ अल्ट्रा झकासच्या माध्यमातून सादर करताना मनापासून आनंद होत आहे. असेच अनेक अॅनिमेटेड चित्रपट ओटीटीवर उपलब्ध असून आणखी नवनवीन चित्रपटांसाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. सुशीलकुमार अग्रवाल म्हणाले.

अधिक माहितीसाठी www.ultrajhakaas.com ला भेट द्या. 

नवनवीन चित्रपट पाहण्यासाठी:- https://www.ultrajhakaas.com/marathi-movies

App link:

https://ultrajhakaas.app.link

‘‘बर्फाची राणी’ या सुपरहिट  चित्रपटाचे प्रोमो पाहण्यासाठी लिंक

https://www.facebook.com/UltraJhakaas

https://www.instagram.com/ultrajhakaas

https://www.youtube.com/@ultrajhakaas

Continue reading

आज वसुबारस!

आश्विन वद्य द्वादशी या दिवशी वसुबारस तसेच गुरुद्वादशी हे सण साजरे केले जातात. वसुबारस हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तूतः हा सण वेगळा आहे. सनातन संस्थेद्वारा संकलित केलेल्या या लेखातून या सणाविषयी तसेच यानिमित्ताने गोपालनाचे महत्त्व थोडक्यात जाणून घेऊया. वसुबारस (गोवत्स द्वादशी)- श्री विष्णूच्या...

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...
Skip to content