Homeन्यूज अँड व्ह्यूजबदल जाओ वक्त...

बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सीखो..

बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सीखो.. महाराष्ट्रात सध्या राजकारणात काय चाललंय समजत नाही, कोण कुणाबरोबर जाईल आणि कोण नेमके कोणत्या पक्षात आहे, हे समजत नाही, अशी स्थिती आहे, ही तक्रार बरेचजण करतात. पण, मुळात गुंतागुंतीचे असलेल्या या राजकारणातील यशाचे रहस्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेतील त्यांच्या भाषणातून गुरुवारी जनतेसमोर मांडले. विधानपरिषदेत सभापतींच्या निवडणुकीच्या वेळी विरोधी पक्षांनी उमेदवार न देत निवडणूक बिनविरोध केल्याबद्दल आभार मानतानाच त्यांनी विरोधकांना जीवनातील यशासाठीचे हे रहस्यही नव्याने सांगितले.

विधानपरिषदेत राम शिन्दे यांची सभापतीपदी बिनविरोध निवड झाली. विरोधी पक्षांनी उमेदवार उभा न केल्याने शिन्दे यांची या पदावर बिनविरोध निवड झाली. त्यानंतर त्यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर विविध सदस्यांनी भूमिका मांडली. विरोधकांचे आभार मानतानाच राम शिन्दे यांच्या अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना अजित पवार म्हणाले की, एक शेर सहज आठवला म्हणून सांगतो. बदल जाओ वक्त के साथ, या फिर वक्त बदलना सीखो.., मजबुरीयोंको मत कोसो, हर हाल में चलना सीखो..

मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी राम शिन्दे यांचा विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव निसटता होता, हे सांगताना टपाली मतांच्या मोजणीनंतर शिन्दे यांचा पराभव झाला, हे निदर्शनाला आणून दिले. तसेच, नियतीने हा पराभव शिन्दे यांना स्वीकारायला लावला कारण कदाचित नियतीला राम शिन्दे यांच्याकडून विधानपरिषदेचे सभापती म्हणून राज्याच्या हिताचे अनेक निर्णय करून घ्यायचे असावेत, अशी टिप्पणीही केली. शिन्दे यांच्या नावातच राम आहे आणि एखादी व्यक्ती सभापतींच्या खुर्चीत बसते तेव्हा रामशास्त्री प्रभुणे यांची रामशास्त्री बाण्याची वृत्तीही कुठेतरी त्या व्यक्तीला प्राप्त होते, असेही फडणवीस म्हणाले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी राम शिन्दे यांचा गौरव करताना ते पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या घराण्यातील आहेत, हा उल्लेख केला. तसेच, विधानपरिषदेत सभापतीही शिन्दे आहेत आमि सभागृह नेताही, मी म्हणजे शिन्देच आहे, असाही उल्लेख केला. त्यावर मुख्यमत्री फडणवीस यांनी जागेवर बसूनच टिप्पणी केली की, विधानपरिषदेत शिन्देशाही आहे. त्यावर एकनाथ शिन्दे म्हणाले की, माझ्याशेजारी मुख्यमंत्री फडणवीस आहेत आणि अजित पवारही आहेत आणि आपली लोकशाही आहे. त्यावर पुन्हा फडणवीस म्हणाले की, आपली लोकशाही आपण शिन्देशाही पद्धतीने चालवू… आणि सभागृहात हंशा उसळला.

बदल

नाना पटोलेंचा आग्रह आणि विधानसभेत पुन्हा पुन्हा वडेट्टीवार…

राज्यपालांच्या अभिभाषणावर त्यांच्या आभारदर्शक ठरावावारील दोन दिवसांच्या चर्चेत काल विधानसभेत एकाच सदस्याला दोन वेळा बोलायची संधी दिली गेली, तेही त्या सदस्याच्या भाषणानंतर दोन सदस्यांची भाषणे झाल्यानंतर..

माजी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना तालिका अध्यक्षांनी दहा मिनिटे बोलू दिल्यानंतरही त्यांनी भाषण सुरू ठेवले. अध्यक्षांच्या खुर्चीतून चैनसुख संचेती यांनी त्यांना बसण्याचा आदेश दिल्यानंतरही ते बोलत राहिले. त्यानंतर त्यांचा माईक बंद केल्यावरही ते बोलत राहिले आणि मला माईकची गरज नाही, असे म्हणून त्यांनी भाषण सुरू ठेवले. पुढचे वक्ते नालासोपाऱ्याचे आमदार राजन नाईक यांनी भाषण सुरू केले आणि त्यावेळी निषेध करत वडेट्टीवार सभागृहाबाहेर गेले. त्यानंतर नाईक यांनी त्यांचे मुद्दे मांडले. त्यांच्यानंतर भाजपा आमदार मनीषा चौधरी यांनी भाषण केले. त्यांचे भाषण संपतासंपता नाना पटोले सभागृहात आले आणि त्यांच्याबरोबर विजय वडेट्टीवारही सभागृहात आले.

नाना पटोले यांनी अध्यक्षांना जाब विचारत प्रश्न केला की, विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे का? त्यांनी विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेते राहिले असल्याने त्यांना बोलू द्यायला हवे, असेही अध्यक्षांना सांगितले. त्यानंतर तालिका अध्यक्ष संचेती यांनी वडेट्टीवार यांना दहा मिनिटे बोलू दिले आहे, असे सांगितले. पण त्यानंतरही नाना पटोले यांनी आग्रह धरल्याने विजय वडेट्टीवार यांना पुन्हा दोन तीन मिनिटे बोलू दिले गेले.

Continue reading

आव्हाड, पडळकरांचे वागणे आठवीतल्या मुलांनाही लाजवणारे…

मी उद्धव ठाकरे यांना सत्ताधारी बाजूला यायचे आहे का, असे लायटर व्हेनमध्ये विचारले होते आणि तुम्ही.. तुम्ही लोकांनी त्याची हेडलाईन करून टाकली, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी आपली कैफियत मांडली तर याच विषयावर उद्धव ठाकरे यांना माध्यमांनी प्रश्न...

दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया…

कामं देताना यांना दिनू मोरे दिसला नाही, पण दिनो मोरिया दिसला आणि आता त्या दिनोने तोंड उघडले तर अनेकांचा मोरया होईल, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री एकनाथ शिन्दे यांनी आज विधानसभेत शिवसेना (उबाठा)वर टीका केली. कोरोना काळात कापड दुकानदार आणि हॉटेलवाल्याला...

व्हेरिफिकेशनसाठीचे अर्थपूर्ण कागद…

पडताळणी किंवा व्हेरिफिकेशनची प्रमाणित कार्यपद्धती म्हणजेच स्टँण्डर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर अस्तित्त्वात असली तरी काही विशिष्ट कागदपत्रे दिल्यानंतर ही पडताळणी कशी वेगाने होते, हे सर्वांना माहीत आहे, अशी टिप्पणी शिवसेना (उबाठा)चे आमदार सुनील प्रभू यांनी आज विधानसभेत केली आणि संपूर्ण सभागृह...
Skip to content