Thursday, November 7, 2024
Homeडेली पल्सऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंना...

ऑलिम्पिकमधल्या भारतीय खेळाडूंना आयुष्मानच्या शुभेच्छा!

“ऑलिम्पिक हा जगातील सर्वात मोठा क्रीडा महोत्सव आहे आणि यात भाग घेणारे आपापल्या क्षेत्रातील महान योद्धे आहेत. आमच्याकडे 117 असे शानदार ऍथलीट आहेत जे यंदाच्या #Paris2024 ऑलिम्पिकमध्ये आमचा झेंडा उंचावण्यासाठी तयार आहेत!”, अशा शब्दांत आयुष्मान खुरानाने ने सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या.

केंद्रीय क्रीडा मंत्री मनसुख मांडविया आणि बॉलीवुड स्टार आयुष्मान खुराना यांनी देशवासीयांना विशेष आवाहन केले आहे- पॅरिस ऑलिम्पिकमध्ये आपल्या देशाला गौरव मिळवून देण्यासाठी भारतीय दलाचे

आयुष्मान

उत्साहवर्धन करा! या मोहिमेची सुरूवात म्हणून आयुष्मानला मनसुख मांडविया यांनी भारतीय संघाचा स्मरणार्थ टीशर्टही दिला.

आयुष्मान पुढे लिहितो, “चला त्यांना भारताचा अभिमान वाढवण्यासाठी प्रोत्साहित करूया. चला त्यांना दाखवूया की आमच्या खेळांबद्दलची आमची दृढता, संकल्प आणि आवड किती गहन आहे. आज युवा कार्य आणि क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया यांना भेटून भारतीय दलाला प्रोत्साहित करण्यासाठी या अभियानाची सुरुवात करण्याचा मोठा सन्मान आहे. जय हिंद!

Continue reading

८ नोव्हेंबरपासून ‘वर्गमंत्री’ आपल्या भेटीला!

राज्यात विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असतानाच आता शाळेतील 'वर्गमंत्री'वर निवडणुकीचा कल्ला होणार आहे. आघाडीचे मराठी कन्टेट क्रिएटर खास रे टीव्ही यांच्यातर्फे वर्गमंत्री, या वेब सीरिजची निर्मिती करण्यात आली असून, अक्षया देवधर, अविनाश नारकर, नेहा शितोळे यांच्यासह उत्तमोत्तम स्टारकास्ट या...

मुंबई जिल्हा कॅरम संघटनेवर पुन्हा प्रदीप मयेकर

मुंबई जिल्हा कॅरम असोसिएशनची त्रैवार्षिक निवडणूक दादर येथील एल. जे. ट्रेनिंग सेंटर येथे नुकतीच पार पडली. या निवडणुकीत प्रदीप मयेकर यांची मानद अध्यक्ष म्हणून तर अरुण केदार यांची मानद सरचिटणीस म्हणून बिनविरोध निवड करण्यात आली. बिनविरोध झालेल्या या निवडणुकीत...

ऊन नका देऊ नेत्याला!

ऊन नका देऊ, नेत्याला.. ऊन नका देऊ.. तसं पाहिलं तर दिवाळीचे दिवस होते. त्यातच उमेदवारीअर्ज भरण्याचीही राजकीय पक्षांची घाई होती. त्यामुळे गेल्या १५ दिवसांत ठाण्याच्या कोर्ट नाका परिसराची भेटच झालेली नव्हती. आज सकाळी दररोजसारखी वाहतूककोंडीही दिसत नव्हती म्हणून म्हटले,...
Skip to content