Homeकल्चर +आरोग्य विज्ञान विद्यापीठात...

आरोग्य विज्ञान विद्यापीठात ‘अवघा रंग एक झाला’!

नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात गणेशोत्सवानिमित्त ‘अवघा रंग एक झाला’ नाटकाचे नुकतेच अभिवाचन करण्यात आले. या कार्यक्रमास कुलगुरु लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त)समवेत लेफ्टनन्ट जनरल राजीव कानिटकर (निवृत्त), प्र-कुलगुरु डॉ. मिलिंद निकुंभ, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परीक्षा नियंत्रक डॉ. संदीप कडू, बोधीकिरण सोनकांबळे, डॉ. देवेंद्र पाटील, ब्रिग. सुबोध मुळगुंद आदी मान्यवर उपस्थित होते.

विद्यापीठातील अधिकारी, कर्मचारी त्यांचे कुटुंबीय यांना कार्यक्रमाच्या माध्यमातून एकत्रित आणण्यासाठी कुलगुरु लेफ्ट. जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्राची सांस्कृतिक परंपरा, वारकरी संप्रदायाची ओळख व अध्यात्मिक भाव यांचा अनोखा मेळ ’अवघा रंग एक झाला’ नाटकाचे अभिवाचन अनुभवण्यास मिळाला, असे कुलगुरु कानिटकर यांनी सांगितले.

सुप्रसिध्द लेखिका व दिग्दर्शिका पल्लवी पटवर्धन लिखित नाटकाचे अभिवाचन पल्लवी पटवर्धनसमवेत श्रीराम गोरे, श्रीया जोशी, रेखा देशपांडे, अमोघी कुलकर्णी, सुगंधा शुक्ल या सहकलाकारांनी केले तसेच वंदन वेलदे यांनी संगीत दिले. या अभिवाचनातून पांडुरंगाच्या भक्तीत तल्लीन झालेल्या वारकऱ्यांचा अनुभव, प्रसंग व भक्तीचा लेखजोखा आपल्या ओजस्वी वाणीत मांडला. अभिवाचनात सहभागी कलाकारांचा कानिटकर यांच्या हस्ते रोपटे व उपरणे देऊन सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे समन्वयन जनंसपर्क अधिकारी डॉ. स्वप्नील तोरणे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यापीठाच्या समितीचे अध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव डॉ. स्वप्नील तोरणे, सदस्य संदीप राठोड, मधुकर भिसे, संदीप महाजन, निलेश ओहोळ, आकांक्षा भोईर, आरती आहेर, नाना परभणे, रविंद्र रांधव यांनी परिश्रम घेतले.

Continue reading

प्री आणि पोस्ट-मॅट्रिक शिष्यवृत्तीसाठी 31 जानेवारीपर्यंत करा अर्ज

मुंबई शहर जिल्ह्यातील विजाभज, इमाव व विमाप्र प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी प्री-मॅट्रिक (इ. 9वी व 10वी) व पोस्ट-मॅट्रिक (इ. 11वी ते पदव्युत्तर / व्यावसायिक अभ्यासक्रम) शिष्यवृत्तीच्या लाभासाठी एनएसपी (नॅशनल स्कॉलरशिप पोर्टलवर) येत्या 31 जानेवारीपर्यंत सादर करावेत, असे इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, मुंबई शहरचे सहाय्यक संचालक रविकिरण पाटील यांनी कळविले आहे. केंद्र...

मकर संक्रांत म्हणजे काय?

मकर संक्रात या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतीय संस्कृतीत हा सण आपापसातील कलह विसरून प्रेमभाव वाढवण्यासाठी साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक जीव ‘तीळगूळ घ्या, गोड बोला’ असे म्हणून जवळ येतो. हा सण तिथीवाचक नाही. मकर संक्रांतीचा...

कृषी प्रदर्शनातून शेतकऱ्यांना नवतंत्रज्ञानाची माहिती

देशातील अव्वल बायोडायव्हर्सिटी आणि विविध पिकांची उत्पादनक्षमता असलेल्या नंदुरबार जिल्हा व परिसरातील कष्टाळू व प्रयोगशील शेतकऱ्यांना शहादा येथे नुकत्याच झालेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनासारख्या आयोजनातून नवतंत्रज्ञानाचे उपयुक्त मार्गदर्शन मिळते. त्याचा उपयोग करून नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी तसेच शेतकरी उत्पादक गट क्रांती...
Skip to content