Homeचिट चॅटऑडी इंडियाची ‘चार्ज...

ऑडी इंडियाची ‘चार्ज माय ऑडी’ सुविधा लाँच!

ऑडी, या जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनीने ‘मायऑडीकनेक्ट’ अॅपवर ‘चार्ज माय ऑडी’च्या लाँचची घोषणा केली आहे. हे विशेषत: ऑडी ई-ट्रॉन ग्राहकांसाठी अॅपवरील विविध चार्जिंग स्टेशन्ससाठी एक-थांबा अॅप्लिकेशन आहे. चार्ज माय ऑडी, हा इंडस्ट्री-फर्स्ट उपक्रम आहे. तो  इलेक्ट्रिक वाहन मालकांच्या सोयीसुविधेवर लक्ष केंद्रित करतो. सध्या अॅप्लिकेशनमध्ये पाच चार्जिंग सहयोगींचा समावेश आहे: आर्गो ईव्ही स्मार्ट, चार्ज झोन, रिलक्स इलेक्ट्रिक, लायनचार्ज आणि झिऑन चार्जिंग, जे न्यूमोसिटी टेक्नॉलॉजीज ईएमएसपी रोमिंग सोल्यूशनद्वारे समर्थित आहेत.

चार्ज माय ऑडी, ग्राहकांना कार्यक्षमपणे त्यांच्या ड्राइव्ह मार्गाचे नियेाजन करण्याची, मार्गातील चार्जिंग स्टेशन्सची माहिती मिळवण्याची, चार्जिंग टर्मिनल्सची उपलब्धता तपासण्याची, चार्जिंग सुरू करण्याची व थांबवण्याची, तसेच सिंगल पेमेंट गेटवेच्या माध्यमातून सेवेसाठी देय भरण्याची सुविधा देते. सध्या ‘चार्ज माय ऑडी’वर ऑडी ई-ट्रॉन मालकांसाठी ७५०हून अधिक चार्ज पॉइण्‍ट्स उपलब्ध आहे आणि पुढील काही आठवड्यांमध्ये व महिन्‍यांमध्ये अधिक चार्ज पॉइण्ट्सची भर त्यात करण्यात येणार आहे.

फोक्सवॅगन ग्रुप सेल्स इंडियाचे कार्यकारी संचालक व बोर्ड सदस्य ख्रिस्तियन कॅन वॉनसीलेन म्हणाले की, ग्रुप म्हणून आम्ही इलेक्ट्रिक गतीशीलतेप्रती कटिबद्ध आहोत आणि सतत इलेक्ट्रिक वाहनांचे मूल्यांकन करत आहोत. त्याअनुषंगाने चार्जिंग इकोसिस्टम विकसित करत आहोत. लक्झरी इलेक्ट्रिक विभागात उत्तम मागणी दिसण्यात येत आहे आणि ग्राहकांसाठी यासारखे उपक्रम मालकीहक्क अनुभवासंदर्भात व्यवहार्यता अधिक प्रबळ करत आहेत.

ऑडी इंडियाचे प्रमुख बलबीर सिंग धिल्लों म्हणाले की, ऑडी इंडिया ग्राहक केंद्रित्वावर लक्ष केंद्रित करते. आम्ही आमच्या ग्राहकांसाठी सतत मूल्यांकन करण्यासोबत सोल्यूशन्स सादर करत आहोत. त्यामुळे मालकीहक्क अनुभव त्रासमुक्त होतो. ‘चार्ज माय ऑडी’ अद्वितीय, इंडस्ट्री-फर्स्ट उपक्रम आहे, ज्याचा ग्राहकांना सोयीसुविधा देण्याचा मनसुबा आहे. आम्ही भारतात ई-ट्रॉन लाँच केल्यापासून इलेक्ट्रिक गतीशीलतेप्रती परिवर्तनाला पाठिंबा देण्यासाठी सर्वसमावेशक इकोसिस्टम निर्माण करण्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

चार्ज माय ऑडी विविध अॅप्लिकेशन्स डाऊनलोड करण्याचा त्रास दूर करते. ऑडी ई-ट्रॉन ग्राहक ‘मायऑडीकनेक्ट’ अॅपचा वापर करत चार्जिंग प्रक्रिया सुरू करू शकतात. त्याचवेळी ऑटोमेटेड आयडेण्टिफिकेशन व बिलिंग प्रक्रिया सुरू होईल.

Continue reading

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...

सेंसॉर बोर्डातून विद्या बालनना डच्चू, प्रीती झिंटांची वर्णी

केंद्र सरकारने केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाची (सेंसॉर बोर्ड) तत्काळ प्रभावाने पुढच्या तीन वर्षांच्या कालावधीसाठी किंवा पुढचा आदेश येईपर्यंत, यापैकी जो आधीचा कालावधी असेल त्या मुदतीसाठी पुनर्रचना केली आहे. या पुनर्रचनेत अभिनय क्षेत्रातले दिग्गज विद्या बालन, गौतमी तडीमल्ला, वाणी त्रिपाठी...

बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली?

शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हाच्या वादावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी एक महत्त्वाची टिप्पणी केली आहे. न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची म्हणाले की, निवडणूक आयोग दोन्ही गटांना वेगवेगळ्या चिन्हांवर स्वतःच्या ताकदीवर निवडणूक लढवण्यास सांगू शकले असते. 'बाळासाहेबांच्या नावाने का मते मागितली गेली; त्यांनी स्वतःच्या ताकदीवर...
Skip to content