Homeटॉप स्टोरी.. अखेर डॉ....

.. अखेर डॉ. नितीन राऊत तोंडावर आपटले!

अखेर पदोन्नतीतल्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून सत्तेसाठी अगतिक असलेल्या काँग्रेसने राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत नांगी टाकली. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर तुम्हाला कळेल डॉ. नितीन राऊत काय करतात ते.. असे थाटात प्रसिद्धीमाध्यमांना सांगणारे काँग्रेसचे नेते व राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत बैठकीनंतर मात्र प्रसिद्धीमाध्यमांना सामोरेच आले नाहीत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत यावर चर्चाच झाली नाही, असे समजते.

मराठा समाजाचे आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविल्यानंतर सात मे रोजी राज्य सरकारने पदोन्नतीतले आरक्षण रद्द करण्याचा देश जारी केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवर यांच्या नेतृत्त्वाखालील मंत्रिमंडळाच्या उपसमितीने हा निर्णय घेतला आणि त्यानुसार हा आदेश निघाला. हा आदेश निघताच काँग्रेसने याला विरोध करायला सुरूवात केली. नितीन राऊत यांनी तर याविरूद्ध रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता.

मंगळवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठक झाली. डॉ. नितीन राऊत या बैठकीला हजर होते. राज्यातले काँग्रेसचे विविध पदाधिकारीही दूरदृष्य प्रणालीने यात सहभागी झाले होते. यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना नाना पटोले आणि नितीन राऊत यांनी सरकारने हा घटनाबाह्य निर्णय केला असून आम्ही तो मागे घ्यायला भाग पाडू असे जाहीर केले होते.

आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार होती. या बैठकीआधीच काल राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी त्यांच्या वर्षा निवासस्थानी जवळजवळ पाऊण तास चर्चा झाली. यामध्ये पदोन्नतीतल्या आरक्षणाचाही विषय होता, असे समजते. आज सकाळीही पवार यांच्या सिल्व्हर ओक, या निवासस्थानी राष्ट्रवादीचे नेते आणि राज्यातले मंत्री अजित पवार, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील आदींची बैठक झाली. या बैठकीतही पदोन्नतीतल्या आरक्षणावर चर्चा झाली.

याचदरम्यान, काँग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांच्याही विधानभवनातल्या पक्षकार्यालयात बैठक झाली. अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत आदी या बैठकीत सहभागी झाले होते. या बैठकीत मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विषयाचा सोक्षमोक्ष लावण्याचे निश्चित झाले. बैठकीआधी प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना राऊत यांनी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आम्ही हा निर्णय मागे घेण्यास भाग पाडू असे सूचित केले होते. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर हा डॉ. नितीन राऊत काय करतो हे समजून येईल, असे सांगितले होते. पण प्रतयक्ष बैठकीत त्यांना बोलूच देण्यात आले नसल्याचे कळते.

मंत्रिमंडळाच्या बैठकीत नितीन राऊत यांनी पदोन्नतीतील आरक्षणाचा विषय काढताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी यावर चर्चा करू, असे सांगत विषय थांबवला. राष्ट्रवादी तसेच शिवसेनेच्या सदस्यांनी तशीच भूमिका घेतली. काँग्रेसचे सदस्य काय करायचे या विचारात असतानाच पुढचा विषय आला आणि राऊत एकाकी पडल्याचे सूत्रांनी सांगितले.

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना एकनाथ शिंदे, राजेश टोपे, तसेच विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या बैठकीत यावर चर्चा होईल, असे सांगत आजच्या बैठकीत काही झाले नसल्याचे मान्य केले.

Continue reading

रणजित दळवी, सुनील लवाटे, जान्हवी मुळे आणि स्वदेश घाणेकर यांचा होणार गौरव

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने क्रीडा पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणार्‍या पत्रकारांना दरवर्षी प्रदान करण्यात येणार्‍या क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. यंदा २०२५ आणि २०२६ या दोन वर्षांसाठी ज्येष्ठ आणि युवा अशा दोन गटांतील चार पत्रकारांची पुरस्कारांसाठी निवड...

शिक्षणतज्ज्ञ प्राचार्य डॉ. सुनिता कामटे सेवानिवृत्त

मुंबईतल्या बोरीवली पूर्व येथील सुविद्या प्रसारक संघाच्या श्री मंगुभाई दत्ताणी विद्यालय आणि योजना कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्राचार्या शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुनिता कामटे आपल्या ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर नुकत्याच सेवानिवृत्त झाल्या. याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सुविद्या प्रसारक संघाचे अध्यक्ष शिक्षणतज्ज्ञ महादेव रानडे...

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सुरेखा पुरंदरे यांचे देहावसान

मुंबईतल्या दादर माटुंगा कल्चरल सेंटरच्या सल्लागार सदस्या तसेच दादर वनिता समाज, या प्रतिष्ठित संस्थेच्या ज्येष्ठ सदस्या सुरेखा पुरंदरे यांचे अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शास्त्रीय संगीतात...
Skip to content