भारत सरकारच्या श्रम आणि रोजगार मंत्रालयाच्या अखत्यारीतील कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे (ईएसआयसी) महासंचालक म्हणून भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी अशोक कुमार सिंह यांनी काल नवी दिल्लीत महामंडळाच्या मुख्यालयात कार्यभार स्वीकारला.
अशोक कुमार सिंह हे 1999च्या केरळ तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. याआधी ते केरळमधील जलसंसाधन विभागाचे प्रधान सचिव होते. जिल्हा तसेच राज्यस्तरावरील संस्थांमध्ये प्रशासन आणि व्यवस्थापनाचा त्यांना दांडगा अनुभव आहे. केंद्रीय स्तरावर त्यांनी स्वच्छ गंगा राष्ट्रीय परियोजनेचे कार्यकारी संचालक म्हणून काम केले आहे. संरक्षण मंत्रालयात सहसचिव तसेच अर्थ मंत्रालयात संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.
अशोक कुमार सिंह यांनी नवी दिल्लीच्या राष्ट्रीय संरक्षण महाविद्यालयातून एमफिल केले आहे. ते आयआयटी कानपूरचे यांत्रिक अभियांत्रिकीचे पदवीधर आहेत.