गोल्डमन सॅक्स इंडिया एआयएफ योजना-1 आणि गोल्डमन सॅक्स इंडिया अलटरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट एआयएफ योजना-2च्या माध्यमातून एपीआय होल्डिंग्स लिमिटेडच्या अनिवार्य परिवर्तनीय प्राधान्य समभागांच्या सदस्यतेला भारतीय स्पर्धा आयोगाने मान्यता दिली आहे.
प्रस्तावित व्यवहारामध्ये गोल्डमन सॅक्स इंडिया एआयएफ योजना-1 (ॲक्वायरर 1) आणि गोल्डमन सॅक्स इंडिया अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट ट्रस्ट एआयएफ योजना-2 (ॲक्वायरर 2) (प्रोपोज)द्वारे एपीआय होल्डिंग्स लिमिटेडच्या (टार्गेट) अनिवार्य परिवर्तनीय प्राधान्य समभागांची सदस्यता समाविष्ट आहे.
एक्वायरर-1 आणि एक्वायरर 2 या गोल्डमॅन सॅक्स इंडिया अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट ट्रस्टने सुरू केलेल्या योजना आहेत, ज्याची स्थापना भारतीय ट्रस्ट कायदा, 1882 अंतर्गत एक निर्धारित ट्रस्ट म्हणून करण्यात आली आहे. गोल्डमन सॅक्स (इंडिया) अल्टरनेटिव्ह इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड हे एक्वायरर 1 आणि एक्वायरर 2 चे गुंतवणूक व्यवस्थापक आहेत.
टार्गेट ही एपीआय होल्डिंग्स समूहाची मूळ संस्था आहे. टार्गेट (संलग्न कंपन्यांसह) भारतातील आरोग्यसेवा क्षेत्रातील विविध व्यावसायिक उपक्रमांमध्ये कार्यरत आहे. यामध्ये औषध उत्पादने, वैद्यकीय उपकरणे आणि ओव्हर द काउंटर (ओटीसी) उत्पादनांची घाऊक विक्री आणि वितरण, निदान सेवांची तरतूद, टेली वैद्यकीय सल्ला सेवा इ. तरतूद यांचा समावेश आहे. भारतीय स्पर्धा आयोगाच्या तपशीलवार आदेशाचे पालन करण्यात येईल.