Homeचिट चॅटचेंबूरच्या मुलांच्या वसतिगृहातल्या...

चेंबूरच्या मुलांच्या वसतिगृहातल्या प्रवेशासाठी करा २० मेपर्यंत अर्ज

मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत सन २०२२-२०२३मधील चेंबूर येथील मुलांच्या वसतिगृह प्रवेशाकरिता अर्जाचे वाटप व स्वीकृती  संत एकनाथ मागासवर्गीय मुलांचे वसतिगृह, भिक्षेकरी गृह परीसर, आर सी मार्ग, चेंबूर  ठिकाणी होणार असून या अर्जांचे वाटप व स्वीकृती २० मे २०२३पर्यंत करण्यात येणार आहे. प्राप्त अर्जांवरून रिक्त जागांवर गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देण्यात येतील. वसतिगृह प्रवेशासाठी विहित कालावधीमध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन समाजकल्याण सहायक आयुक्तांनी केले आहे.

मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये ७५० क्षमतेचे मुलांचे वसतिगृह प्रस्तावित आहे. यापैकी २५० मुलांची क्षमता असलेले वसतिगृह वर्ष २०२२-२३ या वर्षांमध्ये सुरू करण्यासाठी राज्याच्या महिला व बालविकास विभागाचे कर्मचारी निवासस्थान तात्पुरत्या स्वरूपामध्ये उपलब्ध झालेले आहे. याठिकाणी पर्यायी व्यवस्था करण्याचे प्रस्तावित आहे.

वसतिगृह प्रवेशाकरिता अर्ज करण्याची पात्रता पुढीलप्रमाणे आहे. विदयार्थी महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा. सदर विद्यार्थ्याकडे पालकांच्या उत्पन्नाचा दाखला असावा. विद्यार्थी सन २०२२-२३मध्ये महाविद्यालयात प्रथम वर्षाकरिता प्रवेशित असावा. स्थानिक रहिवासी नसावा. विद्यार्थ्याचा महाविद्यालयातील प्रवेश निश्चित झालेला असावा. अर्ज सादर केला म्हणजे प्रवेश निश्चित झाला असे नाही. पात्र असलेल्या विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत आपले अर्ज सादर करावे, असे आवाहन मुंबई उपनगरचे समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसाद खैरनार यांनी केले आहे.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content