Homeहेल्थ इज वेल्थमुंबईत यंदापासून सुरू...

मुंबईत यंदापासून सुरू होणार आणखी एक वैद्यकीय महाविद्यालय

मुंबईत आणखी एक शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैक्षणिक वर्षापासून सुरू होणार आहे. गोकुळदास तेजपाल रुग्णालय आणि कामा रुग्णालय, मुंबई येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येत्या शैत्रणिक वर्षापासून म्हणजेच २०२४-२५ पासून ५० विद्यार्थी प्रवेशसंख्येचे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे दिली. मुंबईत सध्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये राज्य शासनाचे वैद्यकीय महाविद्यालय चालविले जाते.

गोकुळदास तेजपाल रुग्णालय आणि कामा रुग्णालय, मुंबई येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्याबाबतचा शासन निर्णय ३१ जानेवारी २०१२ रोजी निर्गमित करण्यात आला आहे. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वीत करण्याच्यादृष्टीने त्याबाबतची प्रशासकीय कार्यवाही व

कागदपत्रांच्या पूर्ततेचे निकष पूर्ण करण्यात आले आहेत. भारतीय आयुर्विज्ञान परिषदेने हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यास अनुमती दिली असल्याचेही त्यांनी सांगितले.

पुढील शैक्षणिक वर्षापासून ही विद्यार्थीसंख्या वाढविण्यात येईल. नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोकुळदास तेजपाल रुग्णालय व कामा रुग्णालयांशी संलग्न असेल. त्यामुळे डॉक्टरांची संख्या वाढून दक्षिण मुंबईतील जनतेला रुग्णसेवा तत्काळ उपलब्ध होण्यास मदत होईल. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याबाबतीत पुढाकार घेऊन सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता. त्यामुळे सर्व विभागाच्या समन्वयातून हे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वीत करण्यात येत असल्याचेही मुश्रीफ यांनी सांगितले.

Continue reading

हक्कभंग समितीसमोर माफी मागण्यास कुणाल कामराचा ठाम नकार

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या उपरोधिक विडंबनामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामरा याने गुरुवारी महाराष्ट्र विधान परिषद विशेषाधिकार (हक्कभंग) समितीसमोर हजर होऊन माफी मागण्यास पुन्हा एकदा स्पष्ट नकार दिला आहे. भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी दाखल केलेल्या...

म. गांधीजींच्या गावातच गुजरात सरकारकडून मद्यविक्रीला परवानगी!

महात्मा गांधींचे जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये इतिहासात पहिल्यांदाच गुजरात सरकारकडून, एका आलिशान हॉटेलला मद्यविक्रीचा परवाना मंजूर करण्यात आला आहे. गुजरात राज्य उत्पादन शुल्क आणि प्रतिबंध विभागाने घेतलेल्या या निर्णयामुळे शहरात वादाला तोंड फुटले असून, गांधीवादी संस्था आणि स्थानिक नागरिकांनी याविरोधात...

मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी पूर्णपणे डिजिटल, जुनी पद्धत बंद!

कल्पना करा, तुमच्या कुटुंबातील एखाद्या गरीब रुग्णाला महागड्या उपचाराची गरज आहे. पूर्वीच्या काळात नातेवाईकांना मंत्रालयापर्यंत धावपळ करावी लागायची, कागदपत्रांची रास भरावी लागायची, दलालांच्या जाळ्यात अडकावे लागायचे आणि उपचारात विलंब होऊन रुग्णाची स्थिती बिघडायची. पण आता ती सगळी कहाणी संपली!...
Skip to content