Homeकल्चर +'दादर माटुंगा'त रंगला...

‘दादर माटुंगा’त रंगला वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राचा वार्षिक पुरस्कार वितरण सोहळा केंद्राच्या गोखले सभागृहात नुकताच थाटात पार पडला. दरवर्षीप्रमाणे संगीत, नाटक, साहित्य अशा विविध क्षेत्रांमधे विशेष उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या कलाकारांना या ह्रद्य सोहळ्यात पुरस्कार प्रदान करण्यात आले.

संगीत शिक्षक जीवन गौरव पुरस्काराच्या मानकरी होत्या शशिकला कैकिणी. संगीत क्षेत्रातील ज्येष्ठ कलावंत नीला भागवत, ज्येष्ठ अभिनेत्री इला भाटे, उत्कृष्ट नाट्यदिग्दर्शक नीरज शिरवईकर, उत्कृष्ट प्रवासवर्णनाच्या पुस्तकाचे लेखक रवि वाळेकर (इजिप्सी या पुस्तकासाठी), उत्कृष्ट विनोदी अभिनेत्री वनिता खरात, उत्कृष्ट संगीत नाट्य क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री डॅा. गौरी पंडित, संगीत विशारदच्या परिक्षेत दादर माटुंगा भागातून प्रथम आलेले विद्यार्थी डॅा. प्रबोध चोबे आणि अदिती करंबेळकर यांना यावेळी सन्मानित करण्यात आले.

नीला भागवत, इला भाटे, डॅा. चोबे यांनी आवर्जून उल्लेख केला की त्यांचे या संस्थेशी अनेक वर्षे जिव्हाळ्याचे संबंध असून त्यांच्याकडून होणारा हृद्य सत्कार आणि पुरस्कार हा आयुष्यातील अविस्मरणीय असा क्षण आहे. यावेळी ‘नायजेरियावर बोलू काही’ हा नायजेरियाच्या वास्तव्यातील रंजक किस्से सांगणारा मेधा अलकरी यांचा दृक्श्राव्य कार्यक्रमदेखील झाला. त्याला उपस्थितांनी दाद देत आणि प्रश्नोतराच्या माध्यमातून शंकानिरसन करून घेतले. कार्यक्रमाचे शानदार सूत्रसंचालन विद्या धामणकर यांनी केले.

Continue reading

आमदार-खासदारांच्या संख्येतली वाढ १९७१पासूनच खंडित!

जेव्हापासून पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने येणाऱ्या २०२९च्या निवडणुकीतच महिला आरक्षण लागू करता येईल का, याची चाचपणी व त्या दिशेने प्रयत्न सुरु केले तेव्हापासून लोकसभा व त्या अनुषंगाने विधानसभांच्या मतदारसंघांची पुनर्रचना व त्या अनुषंगाने आमदार, खासदारांच्या संख्येचा मुद्दा गाजू लागला...

जाणून घ्या पितृपक्षाचे महत्त्व!

रविवारपासून हिंदू धर्मशास्त्रानुसार पितृपक्षाला सुरूवात झाली. काही जण याला म्हाळवस म्हणतात तर काही जण या पंधरवड्याला महालय म्हणतात. हिंदू धर्माने सांगितलेल्या ईश्वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषीऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी पितरांसाठी श्राद्धविधी करणे आवश्यक...

रविवारी आनंद घ्या सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा!

मुंबईतल्या दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्राच्या वतीने येत्या रविवारी, २७ सप्टेंबरला सायंकाळी पाच वाजता नाना व भाऊ राजाध्यक्ष यांच्या स्मरणार्थ राजाध्यक्ष कुटुंबियांच्या सहकार्याने सिद्धार्थ बेलमन्नु यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम संस्थेच्या वा. वा. गोखले सभागृहात होईल. याप्रसंगी त्यांना यति...
Skip to content