Friday, July 12, 2024
Homeचिट चॅटबीएलएस ई-सर्विसेसकडून आर्थिक...

बीएलएस ई-सर्विसेसकडून आर्थिक निकालांची घोषणा

बीएलएस ई-सर्विसेस लि. या नागरिकांना ई-गव्‍हर्नन्‍स सेवा, बिझनेस करस्‍पॉण्‍डंट सेवा आणि असिस्‍टेड ई-सर्विसेस देणाऱ्या तंत्रज्ञान-सक्षम डिजिटल सेवा प्रदाता कंपनीने ३१ डिसेंबर २०२३ रोजी समाप्‍त झालेल्‍या तिमाहीसाठी आणि नऊमाहीसाठी त्‍यांच्या लेखापरिक्षित न केलेल्‍या एकत्रित आर्थिक निकालांची नुकतीच घोषणा केली.  

बीएलएस ई-सर्विसेसने भारतीय स्टॉक एक्स्चेंज उदा. एनएसई आणि बीएसईवर शेअर्सना सूचीबद्ध केल्यानंतर त्यांचे पहिले तिमाही आर्थिक निकाल सादर केले. ३१ डिसेंबर २०२३ रोजी समाप्‍त झालेल्‍या तिमाहीसाठी कंपनीचा एकत्रित महसूल संबंधित मागील तिमाहीमधील ६९.०७ कोटी रूपयांच्‍या तुलनेत ७१.६५ कोटी रूपये होता. ऑपरेटिंग ईबीआयटीडीए १५.७ टक्‍क्‍यांनी वाढून १०.३१ कोटी रूपयांपर्यंत पोहोचले. कंपनीचा ऑपरेटिंग ईबीआयटीडीए मार्जिन १४.४ टक्‍के राहिले आणि १५० बीपीएसने वाढले. या विस्‍तारीकरणचे प्रमुख श्रेय सुधारित व्‍यवसाय संयोजनाला जाते.

आर्थिक वर्ष २४ची नऊमाही विरूद्ध आर्थिक वर्ष २३ची नऊमाही

कार्यसंचालनामधून महसूल आर्थिक वर्ष २३च्‍या नऊमाहीमधील १७०.३५ कोटी रूपयांच्‍या तुलनेत ३३.७४ टक्‍क्‍यांनी वाढून आर्थिक वर्ष २४च्‍या नऊमाहीमध्‍ये २२७.८३ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. ईबीआयटीडीए आर्थिक वर्ष २३च्‍या नऊमाहीमधील २०.८८ कोटी रूपयांच्‍या तुलनेत ४८.१७ टक्‍क्‍यांनी वाढून आर्थिक वर्ष २४च्‍या नऊमाहीमध्‍ये ३०.९४ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. आर्थिक वर्ष २४च्‍या नऊमाहीसाठी ईबीआयटीडीए मार्जिन्‍स आर्थिक वर्ष २३च्‍या नऊमाहीमधील १२.२६ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत १३.५८ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. पीबीटी (करपूर्व नफा) (अपवादात्‍मक वस्‍तू वगळून) आर्थिक वर्ष २३च्‍या नऊमाहीमधील १८.०७ कोटी रूपयांच्‍या तुलनेत ७३.७ टक्‍क्‍यांनी वाढून आर्थिक वर्ष २४च्‍या नऊमाहीमध्‍ये ३१.२९ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. करोत्तर नफा (पीएटी) आर्थिक वर्ष २३ च्‍या नऊमाहीमधील -४.८७ कोटी रूपयांच्‍या तुलनेत आर्थिक वर्ष २४ च्‍या नऊमाहीसाठी २२.६३ कोटी रूपये राहिला.

आर्थिक वर्ष २४ची तिमाही विरूद्ध आर्थिक वर्ष २३ ची तिमाही

कार्यसंचालनामधून महसूल आर्थिक वर्ष २३च्‍या तिसऱ्या तिमाहीमधील ६९.०७ कोटी रूपयांच्‍या तुलनेत आर्थिक वर्ष २४च्‍या तिसऱ्या तिमाहीमध्‍ये ७१.६५ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला. या वाढीचे श्रेय व्‍यवसाय पत्रव्‍यवहार विभागातील वाढीला जाते. कंपनीचा ईबीआयटीडीए आर्थिक वर्ष २४च्‍या तिसऱ्या तिमाहीमध्‍ये १०.३१ कोटी रूपयांपर्यंत पोहोचला, ज्‍यामध्‍ये वार्षिक १५.६५ टक्‍क्‍यांची वाढ झाली. ईबीआयटीडीए मार्जिन्‍स आर्थिक वर्ष २३ च्‍या तिसऱ्या तिमाहीमधील १२.९१ टक्‍क्‍यांच्‍या तुलनेत १४.३९ टक्‍क्‍यांपर्यंत वाढले. पीबीटी (करपूर्व नफा) (अपवादात्‍मक वस्‍तू वगळून) आर्थिक वर्ष २३च्‍या तिसऱ्या तिमाहीमधील ८.२७ कोटी रूपयांच्‍या तुलनेत २७.१ टक्‍क्‍यांनी वाढून आर्थिक वर्ष २४च्‍या तिसऱ्या तिमाहीमध्‍ये १०.५१ कोटी रूपयांपर्यंत पाहोचला. करोत्तर नफा (पीएटी) मागील आर्थिक वर्षाच्‍या याच कालावधीमधील -१२.०६ कोटी रूपयांच्‍या तुलनेत आर्थिक वर्ष २४ च्‍या तिसऱ्या तिमाहीसाठी ७.९५ कोटी रूपये राहिला.  

बीएलएस ई-सर्विसेस लि.चे अध्‍यक्ष शिखर अग्रवाल म्‍हणाले की, आम्‍हाला इनिशियल पब्लिक ऑफरिंगच्‍या माध्‍यमातून प्रतिष्ठित एनएसई व बीएसईवर बीएलएस ई-सर्विसेस लि.च्‍या शेअर्सच्‍या यशस्‍वी सूचीकरणाची घोषणा करताना आनंद होत आहे. हा ई-गव्‍हर्नन्‍स, बिझनेस करस्‍पॉण्‍डंट आणि असिस्‍टेड ई-सर्विसेस क्षेत्रांमधील तंत्रज्ञान व सेवा सर्वोत्तमतेप्रती आमच्‍या प्रवासामधील महत्त्वाचा टप्‍पा आहे. या आयपीओने यशस्‍वीरित्या ३१० कोटी रूपयांचा निधी उभारला आहे, ऑर्गनिक व इनऑर्गनिक विकास संधी निर्माण केल्‍या आहेत, ज्‍यामधून आमचा दृष्टिकोन आणि आमच्‍या प्रबळ विकास धोरणावरील गुंतवणूकदारांचा विश्‍वास दिसून येतो. आम्‍ही विशेषत: ई-गव्‍हर्नन्‍स सेवांमधील मोठे करार व निविदांसाठी सक्रियपणे बोली लावत आहोत. तसेच आमच्‍या व्‍यवसाय पत्रव्‍यवहार सेवांना विस्‍तारित करण्‍यासाठी विविध आर्थिक संस्‍थांसोबत सक्रियपणे सहयोग करत आहोत. या प्रयत्‍नांना पूरक तंत्रज्ञान व पायाभूत सुविधेमधील आमची गुंतवणूक आहे, जेथे आमच्‍या सेवा ऑफरिंग्‍ज आणि कार्यरत क्षमतांमध्‍ये अधिक वाढ करण्‍याचा मानस आहे.

Continue reading

महाराष्ट्रातल्या आमदारांचे उपराष्ट्रपतींनी टोचले कान!

उच्च लोकशाही परंपरा, नैतिक मूल्य याबद्दल खूप काही बोलले जाते. त्याचे पालन करण्याची जबाबदारी संसदीय लोकशाहीवर विश्वास असणाऱ्या प्रत्येकाची आहे. सभागृहातील वागण्याबोलण्यातून ती दिसली पाहिजे. सभागृहाबाहेर असणाऱ्या प्रत्येकाचे लक्ष येथील घडामोडींवर असते. त्यामुळे प्रत्येक सदस्याने आणि राजकीय पक्षानेही नैतिकता पाळली...

डेंग्यूला रोखण्यासाठी घाला शरीर पूर्णपणे झाकणारी वस्त्रे

डेंग्यू पसरवणाऱ्या सामान्यपणे  दिवसा चावणाऱ्या एडीस डासांबाबत समाजाला जागरूक करण्यासाठी, शाळेत जाणाऱ्या मुले आणि इतरांसाठी शरीर पूर्णपणे झाकून ठेवणारे कपडे घालण्याबाबत जनजागृती मोहीम राबवली जाईल तसेच पाणी साठवण्याची विविध भांडी आणि इतर भांड्यांमध्ये साठून राहणाऱ्या अस्वच्छ पाण्यापासून मुक्त ठेवण्याचे...

मुंबई कोस्टल रोडचा आणखी एक टप्पा सुरू

मुंबई कोस्टल रोड म्हणजेच धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (दक्षिण) प्रकल्पातील हाजी अली ते खान अब्दुल गफार खान मार्गापर्यंत प्रवासाला उपयुक्त ठरणारा टप्पा आज सकाळी ७ वाजल्यापासून तात्पुरत्या स्वरुपात खुला झाला आहे. किनारी रस्ता प्रकल्पातील हाजी...
error: Content is protected !!