Homeएनसर्कलअॅल्युमिनियम खिडक्यांचा ब्रॅण्ड...

अॅल्युमिनियम खिडक्यांचा ब्रॅण्ड एटर्निया लोणावळ्यात!

हिंडाल्कोचा एक विभाग असलेल्या एटर्नियाने महाराष्ट्रातील लोणावळा येथे आपल्या नव्या ब्रॅण्ड शोरूमचे नुकतेच उद्घाटन केले. अॅल्युमिनियमपासून विकसित केलेल्या व स्वामित्वहक्क प्राप्त दुरेनियम या मिश्र धातूपासून बनविलेल्या खिडक्यांचा भारतातील अव्वल ब्रॅण्ड एटर्निया आता या स्टेट-ऑफ-द-आर्ट शोरूममध्ये मांडणार आहे. या खिडक्या आवाज, प्रदूषण, पाणी गळणे आणि वेगवान वादळी वाऱ्यांपासून संरक्षण पुरविण्याच्यादृष्टीने अत्यंत उपयुक्त असून येथील निवासी जागांच्या गरजा नेमकेपणाने पुरविणाऱ्या आहेत. लोणावळ्यातील एटर्निया स्टोअर हे वर्सोली येथे असून लोणावळ्यातील रहिवाशांना उत्कृष्ट दर्जाच्या अॅल्युमिनियम खिडक्यांचा पर्याय देण्यासाठी विशेषत्वाने उघडण्यात आले आहे. लोणावळ्यातील एटर्निया स्टोअरचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या हस्ते झाले.

देशभरामध्ये आपले अस्तित्त्व भक्कमपणे प्रस्थापित करण्याचे लक्ष्य बाळगून असलेल्या एटर्नियाच्या महत्त्वाकांक्षी विस्तार धोरणातील एक लक्षणीय टप्पा या स्टोअरच्या उद्घाटनामुळे गाठला गेला आहे. लोणावळ्यामध्ये प्रवेश करून या ब्रॅण्डने उदयोन्मुख बाजारपेठांतील संधींचा लाभ घेण्यासाठी तसेच ग्राहकांच्या बदलत्या गरजांची पूर्तता करण्याप्रती आपली बांधिलकी दाखवून दिली आहे. किरकोळ विक्रीसाठीच्या या आउटलेटमध्ये ग्राहकवर्गाच्या विशिष्ट गरजांनुसार उत्पादनांची वैविध्यपूर्ण श्रेणी उपलब्ध असणार आहे.

आदित्य बिर्ला समूहातील कंपनी हिंडाल्को इंडस्ट्रीज लिमिटेडच्या एटर्निया विभागाच्या हेड ऑफ मार्केटिंग नेहल बझरी म्हणाल्या की, एटर्निया उत्कृष्ट दर्जाच्या अॅल्युमिनियम खिडक्या आणि दारे आदी उत्पादने लोणावळ्यामध्ये उपलब्ध करून देताना आम्ही अत्यंत भारावलो आहोत. उदयोन्मुख बाजारपेठेतील चोखंदळ होमओनर्सना उच्च दर्जाची, नाविन्यपूर्ण उत्पादने पुरविण्याप्रती आमच्या बांधिलकीचे प्रतिनिधीत्व हे शोरूम करते. आमच्या विवा प्रमाणित दुरेनियम या मिश्रधातूपासून बनलेल्या खिडक्यांच्या माध्यमातून आम्ही पर्यावरणीय घटकांपासून अतुलनीय संरक्षण देऊ करत आहोत व त्याचवेळी घरांचे सौंदर्यही वृद्धींगत करत आहोत. हे उद्घाटन म्हणजे आमच्या देशव्यापी विस्तारधोरणातील एक लक्षणीय पाऊल आहे आणि नाजूकपणा, टिकाऊपणा व प्रगत तंत्रज्ञान यांना एकत्र आणणारी आमची उत्पादने लोणावळ्यातील लोकांना पुरविण्यास आम्ही उत्सुक आहोत.

Continue reading

मुंबईत पालिका सुविधा केंद्रात जन्म-मृत्यू नोंदणीसाठी स्वतंत्र खिडकी

मुंबई महापालिका क्षेत्रातील जन्म व मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी तसेच नोंदणीकृत जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांतील आवश्यक दुरुस्त्या करण्यासाठी पालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयातल्या नागरी सुविधा केंद्राच्या ठिकाणी स्वतंत्र खिडकी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. नागरिक सेवा केंद्रात ऑनलाईन सेवा विभागस्तरावर जन्म...

‘माझ्या सोन्या’तली अभिनेत्री ऐश्वर्या नक्की आहे तरी कोण?

मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट क्रिएटर ऐश्वर्या हरिशंकर सध्या चांगल्याच चर्चेत आहे. अमेरिकेतील डेट्रॉईट (मिशिगन) येथे जन्मलेल्या आणि पुण्यात वाढलेल्या ऐश्वर्याने अवघ्या २१व्या वर्षी अभिनय, चित्रपट निर्मिती आणि सोशल मीडिया...

शिक्षणाचे माहेरघर पुणे ठरले ‘नीट’ पेपरफुटीमागचे मुख्य केंद्र!

वैद्यकीय प्रवेश अर्थात 'नीट' परीक्षेचा पेपर छापखान्यातून फुटला नव्हता. उलट नॅशनल टेस्टिंग एजन्सी म्हणजेच 'एनटीए'च्याच मंडळींनी नीट पेपर फोडण्याचा उद्योग केला आहे. गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय)ने विशेष न्यायालयात दाखल केलेल्या आरोपपत्रात हा खळबळजनक खुलासा करण्यात आला आहे. 'एनटीए'च्या विषय...
Skip to content