Homeहेल्थ इज वेल्थकर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी आता...

कर्करोगग्रस्तांच्या मदतीसाठी आता अ‍ॅक्टोसाईट टॅब्लेटस

भारताचा अणुऊर्जा विभाग आणि बेंगळुरूच्या आयडीआरएस लॅब्स प्रायव्हेट लिमिटेडच्या सहयोगातून पूरक अन्न / न्युट्रासुटिकल अ‍ॅक्टोसाईट टॅब्लेटस (गोळ्या) समारंभपूर्वक बाजारात आणल्या आहेत. या टॅब्लेटसमुळे रेडिओथेरपी घेणाऱ्या कर्करोग रुग्णांचं जीवनमान उंचावणार आहे.          

मुंबईचे भाभा अणु संशोधन केंद्र, नवी मुंबईचे कॅन्सर प्रशिक्षण संशोधन आणि शिक्षण प्रगत केंद्र, मुंबईचे टाटा मेमोरियल हॉस्पिटल आणि आडीआरएस प्रयोगशाळा यांच्या संशोधकांनी ही टॅब्लेट विकसित केली  असून या सर्व संस्थांचे अधिकारी या  कार्यक्रमाला उपस्थित होते. भारतीय अन्नसुरक्षा आणि मानक प्राधिकरणाकडून (एफएसएसएआय) अ‍ॅक्टोसाईटला मंजुरी मिळाली आहे. अणुऊर्जा विभागाच्या अनेक दशकांच्या संशोधनाने या औषधाच्या विकासाला पाठबळ दिले आहे. या गोळ्यांमुळे  भारतात परवडणाऱ्या किंमतीत कॅन्सर सेवा मिळणार आहे. हे महत्त्वपूर्ण योगदान असून या गोळ्या आता बाजारात उपलब्ध होतील.

या गोळ्यांची परिणामकारता उल्लेखनीय आहे. प्रामुख्याने पेल्व्हिक भागातील कॅन्सरग्रस्तांना रेडिओथेरपीच्या दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. त्यांच्यासाठी या गोळ्या उपयोगी पडतात. रेडिओथेरपीमुळे शरीरात निर्माण झालेल्या टॉक्सिसिटी म्हणजेच विषारी घटकांच्या दुष्परिणामापासून  रूग्णांचे रक्षण करण्याची ताकद या गोळ्यांमध्ये असून त्यामुळे रूग्णाला दिलासा मिळतो. कॅन्सर रेडिओथेरपी, रीजनरेटिव्ह न्यूट्रास्युटिकल, इम्युनोमोड्युलेटर आणि अँटिऑक्सिडंटसाठी सहायक रचना असलेल्या या गोळ्या कर्करूग्णांच्या सेवेत झालेल्या लक्षणीय प्रगतीचे द्योतक आहे.

अणुऊर्जा विभागाच्या शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचे आणि आयडीआरएसच्या यशस्वी व्यावसायिकतेचे मुंबईचे भाभा अणु संशोधन केंद्राचे संचालक (बीएआरसी) विवेक भसीन यांनी यावेळी सर्वांचे कौतुक केले. सर्व संबंधितांनी मोठ्या प्रमाणावर केलेल्या संशोधनामुळे हे उत्पादन बाजारात आले आहे, असेही ते म्हणाले. कर्करोगाच्या उपचारादरम्यान निरोगी ऊतींचे किरणोत्सारामुळे होणारे नुकसान रोखण्यासाठी या गोळ्यांचा उपयोग होईल, असेही त्यांनी सांगितले.

Continue reading

असे आहे नवरात्रीचे शास्त्र!

कालपासून, सोमवारपासून शारदीय नवरात्रौत्सवाला सुरूवात झाली आहे. नवरात्रात घटस्थापना करतात. घटरूपी ब्रह्मांडात अवतीर्ण झालेल्या तेजस्वी अशा आदिशक्तीचे म्हणजेच श्री दुर्गादेवीचे अखंड तेवणार्‍या नंदादीपाच्या माध्यमातून नऊ दिवस पूजन करणे, म्हणजे नवरात्रोत्सव साजरा करणे. नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण अल्प करण्यासाठी...

नेपाळमध्ये पुन्हा महापूर! ३५ जण बेपत्ता!!

नेपाळच्या आज सकाळी बूढी गंडकी नदीला आलेल्या महापूरामुळे गोरखा जिल्ह्याला तडाखा बसल्याचे समजते. या पुरात ३५ जण वाहून गेल्याचे वृत्त असून नेपाळ प्रशासन त्यांची माहिती गोळा करत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा पूर इतका प्रचंड होता की त्यात या...

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील तज्ज्ञांना आता मिळणार दरमहा पावणेपाच लाख!

केंद्र शासनाने जारी केलेल्या सुधारित भारतीय सार्वजनिक आरोग्य मानकांनुसार तज्ज्ञांच्या कामगिरीचे निकष, आरोग्य संस्थांमधील त्यांची उपलब्धता व उपयोग आणि अंमलबजावणीतील अडचणी विचारात घेऊन राष्ट्रीय आरोग्य अभियानाने अभियानातील तज्ज्ञांसाठी कामगिरीआधारित मानधनाची सुधारित रचना निश्चित केली आहे. सुधारित रचनेनुसार पूर्णवेळ स्त्रीरोगतज्ज्ञ,...
Skip to content