Homeएनसर्कलएंजल ब्रोकिंगची एआय...

एंजल ब्रोकिंगची एआय आधारीत चॅटबॉटची सुविधा

एंजल ब्रोकिंगने अॅक्सलरेटेड मोबाइल पेजेसमध्ये (एएमपी) एआय आधारीत पूर्णपणे एकिकृत चॅटबॉट आणले असून अशी सुविधा देणारी ही पहिली बीएफएसआय कंपनी आहे.

या नव्या सुविधेमुळे एंजल ब्रोकिंगच्या ग्राहकांना अधिक सुलभता व लवचिकता प्रदान केली जाईल. तसेच वेबसाइटवरील यूझर्सचा अनुभवही वृद्धींगत होईल. यासोबतच, ही सुविधा मोबाइल तसेच डेस्कटॉपद्वारेही मिळवता येईल. अॅक्सलरेटेड मोबाइल पेज किंवा एएमपी हा गूगलचा ओपन-सोर्स प्रोजेक्ट असून याद्वारे वेब पेजेस मोबाइलवरही योग्य रितीने कार्यरत होतात.

एंजल ब्रोकिंगचे चीफ ग्रोथ ऑफिसर प्रभाकर तिवारी म्हणाले की, आमच्या कंपनीत ग्राहकांच्या अनुभवाला सर्वाधिक प्राधान्य दिले जाते. आम्ही ग्राहकांना सातत्याने सर्वोत्कृष्ट सेवा प्रदान करतो, प्रथम गुंतवणूक करणाऱ्यासाठी तसेच नियमित ट्रेडर्ससाठीदेखील हे खूप महत्त्वाचे ठरते. एएमपीमधील एएआय आधारीत चॅटबॉट हा या दृष्टीकोनाचा दाखला आहे. यामुळे ग्राहकांच्या एकंदरीत अनुभवात भर पडेल, अशी आम्हाला खात्री आहे. या इंटिग्रेशनमुळे आमचे मोबाइल वेब अॅप्लिकेशन अधिक संवादात्मक व आकर्षक बनेल.

एंजल ब्रोकिंगचे सीईओ विनय अग्रवाल म्हणाले की, स्टॉक मार्केट हे प्रत्येकाला वापरता यावे, याकरिता एंजल ब्रोकिंगने मोबाइल-फर्स्ट दृष्टीकोन स्वीकारला आहे. देशभरातील रिटेल सहभाग वाढवावा, असा आमचा उद्देश आहे. विशेषत: निम-शहरी आणि ग्रामीण भागात, जिथे सु‌विधा नाहीत, त्या भागावर आमचा भर आहे. हे साध्य करण्यासाठी ग्राहकांच्या अनुभवाबरोबरत गुंतवणुकदारांच्या शिक्षणाचीही मोठी भूमिका आहे. आम्ही एआय आधारीत चॅटबॉट हा एएमपीमध्ये जोडला असून याद्वारे दोन्ही उद्दिष्टे साध्य होतील. नवनवीन सेवांची सुरुवात या क्षेत्रात करून आघाडी मिळवण्याची एंजल ब्रोकिंगची परंपरा या नव्या सुविधेद्वारे आम्ही अखंड सुरु ठेवली आहे.

या सुविधेमुळे एएमपी पेजेस तत्काळ लोड होतात, वेगाने प्रतिसाद देतात तसेच पूर्वीपेक्षा वापरण्यास सोपे ठरतात. ते एचटीएमएल/सीएसएस आणि जावा स्क्रिप्टचा वापर मर्यादित करतात, यामुळे वेबच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो. स्टॉक ब्रोकिंग क्षेत्रात तसेच बीएफएसआय सेक्टरमध्ये एंजल ब्रोकिंग नेहमीच नूतनाविष्कारात आघाडीवर असते.

या डिजिटल-फर्स्ट ब्रोकरने ‘ट्रेड इन १ आवर’ (आता ५ मिनिटांपेक्षा कमी वेळेत), इन्व्हेस्टमेंट इंजिन एआरक्यू (आता एआरक्यू प्राईम) आणि म्युच्युअल फंडसाठी युपीआय ऑटोपे इंटिग्रेशनसारख्या सुविधा सर्वप्रथम दिल्या. नव्याने दिलेल्या सुविधेद्वारे गुंतवणूकदारांना त्यांच्या सामान्य गुंतवणुकीच्या शंकांचे निरसन होण्यास मदत मिळेल व याद्वारे त्यांना माहितीपूर्ण गुंतवणूक निर्णय घेता येईल. यामुळे त्यांना उत्कृष्ट यूझरचा अनुभव मिळेल.

Continue reading

मीरा-भाईंदर महापालिकेच्या महासभेत पैलवानांचा सत्कार

श्री गणेश आखाडा, भाईंदर येथील राज्य, राष्ट्रीय तसेच विविध प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या गुणवंत पैलवानांचा विशेष सत्कार मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेच्या निमित्ताने नुकताच करण्यात आला. या सत्कार सोहळ्यात ओम जाधव, कोमल पटेल, मनस्वी राऊत, मनीषा शेलार या कुस्तीपटूंचा...

लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात देशभक्तीचा जल्लोष

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधत लालबागच्या भारतमाता सिनेमागृहात भारतमातेचा जयजयकार आणि देशभक्तीचा जोश अनुभवायला मिळाला. विनर्स लाईफ ट्रेनिंगच्या वतीने भारतमाता गीताचे देशभक्तीमय वातावरणात दिमाखदार अनावरण करण्यात आले. विशेष म्हणजे, ज्या भारतमाता सिनेमागृहात या गीताचे अनावरण झाले, त्याचठिकाणी भारतमातेच्या जयघोषाने वातावरण अक्षरशः...

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून चित्रनिर्मितीः २५ ऑगस्टला कार्यशाळा

चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा (AI) वाढता वापर लक्षात घेता, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित चित्रनिर्मिती’, या विषयावर एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. येत्या २५ ऑगस्टला मुंबईतल्या चित्रनंगरीतल्या चित्रांगण हॉल येथे सकाळी...
Skip to content