Wednesday, July 3, 2024
Homeमाय व्हॉईसशेवटी छायाचित्रे बोलतातच..

शेवटी छायाचित्रे बोलतातच..

ही दोन छायाचित्रे आपल्याच राज्यातील शेजारीशेजारी असलेल्या महानगरांतल्या रस्त्यांची आहेत. एक आहे अंतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या गाड्यांसाठी महत्त्वाचा असलेला मुंबईतील पी डिमेलो मार्ग आणि दुसरे छायाचित्र आहे राज्यातील अति महत्त्वाची व्यक्ती असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाणे शहरातील!

यातील समान धागा म्हणजे दोन्हीकडे रसत्याच्या दुरुस्तीचे काम सुरू आहे. यातील पडद्याआडचे कलाकार दोन्हीकडील नोकरशहा आहेत. पी डिमेलो मार्गांवरील रसत्यावर वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून खोदकाम केलेल्या रस्त्यावर जाडसर लोखंडी पत्रा अंथरुन वाहतुकीत खंड पडू नये म्हणून घेतलेली काळजी. तर दुसरीकडे ठाणे शहरातील बापूडवाणा कोलशेत रोड! त्यात उखडून ठेवलेल्या रस्त्यावरील शिळा आपला उद्धार करायला श्री राम प्रभू कधी बरे येतील या विवंचनेत उन खात बसलेल्या आहेत.

तसे पाहिले तर हा रस्ता सुमारे अडीच वर्षं रुंदीकरणाचे स्वप्न पाहात उजाड झाला आहे. श्री राम प्रभू वनवासात गेल्यावर शिळेचा उद्धार झाल्याची कथा सांगतात. आता ठाण्यात कुणाला वनवासात पाठवल्यावर या रस्त्याचे काम मार्गी लागेल याबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. आपल्यासाठीही कोणी लोखंडी पत्रा अंथरून चालता येईल असा रस्ता द्यावा, अशी विनवणी ढोकाली नाका परिसरात राहणारे अबालवृद्ध नागरिक मुख्यमंत्री महोदयांना करत आहेत. अति महत्वाच्या व्यक्तींना देता त्या सर्व सुविधा आम्हाला नकोतच. परंतु चालण्याच्या अधिकारासाठी रस्ता द्या, इतुकीच मागणी मायबापा पूरी करावी अशी विनंती आज हनुमानाकडेच करण्यात आली आहे.

छायाचित्र मांडणी- श्रेया साळसकर

Continue reading

आता न्यायमूर्तींनीच रेल्वेला प्रवाशांच्या ने-आणीचे प्रशिक्षण द्यावे!

गेले काही दिवस या ना त्या कारणाने रेल्वे खाते चर्चेतच आहे. कधी लोकल गाडीतून खाली पडून प्रवाशाचा मृत्यू, तर कधी रेल्वे गाड्यांची टक्कर, कधी सिग्नल यंत्रणेत बिघाड म्हणून टाइमटेबल कोलमडले.. आदी अनेक कारणांमुळे रेल्वे बातम्यात असतेच असते! कोणी कितीही...

मुंबईत झुळूझुळू नदी वाहते.. पण गुळगुळीत कागदावर!

गेले सतत दोन आठवडे मी मुंबईतील प्रमुख वर्तमानपत्रात येणाऱ्या व पहिल्या पानावर विराजमान होणाऱ्या चिकन्याचुपड्या भाषेत लिहिलेल्या तसेच छायाचित्रांनी नटलेल्या भरगच्च जाहिराती पाहत होतो. कालच्या शनिवारी तर एका इंग्रजी वर्तमानपत्राने पहिली चक्क पूर्ण दहा पाने निवासी संकुलांच्या जाहिरातीनी नटवलेली...

चला.. राजकीय प्रदूषणाचा भिकार खेळ संपला!

गेले पाच-सहा महिने सुरु असलेले राजकीय प्रदूषण अखेर कालच्या निवडणूक निकालाने संपले. राजकीय प्रदूषण अशासाठी म्हटले की, निवडणूक प्रचार व त्याआधी विविध राजकीय पक्षांच्या जवळजवळ सर्वच नेत्यांनी शब्दांची 'होळी' वा 'शिमगा' साजरा केला होता. केवळ शब्दच कानावर पडत होते...
error: Content is protected !!