Thursday, October 24, 2024
Homeमाय व्हॉईसअखेर अजितदादांचीच राष्ट्रवादी...

अखेर अजितदादांचीच राष्ट्रवादी काँग्रेस!

राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष कोण हे मी ठरवू शकत नाही. सर्व निकषांची तपासणी केल्यानंतर विधिमंडळ पक्षात बहुमत कुणाचे हा एकमेव निकष महत्त्वाचा ठरतो. त्यामुळे राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणात विधिमंडळ पक्षाच्या बहुमाताचा विचार करावा लागला. 53 पैकी 41 आमदार अजित पवार यांच्याकडे आहे. हे बहुमत शरद पवार गटाने नाकारले आहे. पण, बहुमताचा विचार करता राष्ट्रवादी काँग्रेस हा अजित पवार यांचाच आहे, असा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज दिला. त्याचवेळी या सर्वच प्रकरणात राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातले आमदार पात्र असल्याचेही त्यांनी जाहीर केले.

या पक्षात कुठलीही फूट पडलेली नाही. मात्र दोन गट तयार झालेले आहेत. प्राथमिक स्तरावर मी पक्षीय रचना, घटना व विधिमंडळ बळ या त्रिसूत्रीवर मत नोंदवत आहे. राष्ट्रवादीची घटना सर्वात महत्त्वाची आहे. दोन्ही गट त्याला बांधिल आहेत. 30 जून 2023ला या पक्षात फूट पडली. अशावेळी नेतृत्त्वाबाबत पक्षाची घटना काय सांगते हे महत्त्वाचे आहे. शिवसेना संदर्भात मी दिलेल्या निकालाचा दाखला याठिकाणी द्यावा लागेल. राष्ट्रवादीत अध्यक्षपदावर दोघांकडून दावा केला जात आहे. दोन्ही गटांकडून पक्षाच्या घटनेप्रमाणे अध्यक्ष निवड झाली नसल्याचा दावा केला जात आहे. दोन समांतर नेतृत्त्व याठिकाणी उभे राहिले आहे. तसेच दोन्ही गटांकडून अपात्रता याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रवादी

29 जून 2023पर्यंत शरद पवार यांच्या अध्यक्षपदाला आव्हान नव्हते. पण 30 जून 2023 रोजी दोन जणांकडून अध्यक्ष असल्याचा दावा करण्यात आला. आपला अध्यक्ष कसा योग्य हे सिद्ध करण्यासाठी दोन्ही बाजूंनी पुरावे दिले. दोन्ही गटांकडून समांतर दावे करण्यात आले. प्रतिनिधींच्या निवडणुकीचे पुरावे शरद पवार गटाकडून सादर करण्यात आले नाहीत. राष्ट्रवादीची वर्किंग कमिटी पक्षाच्या घटनेप्रमाणे सर्वोच्च यंत्रणा आहे. त्यात १६ कायमस्वरूपी सदस्य आहेत. मात्र पक्षाची घटना कायमस्वरूपी सदस्यांना परवानगी देत नाही. नेतृत्त्वरचना, पक्षीय घटना आणि विधिमंडळ बळ पाहून पक्ष कुणाचा हे ठरवावे लागेल. यामध्ये पक्षीय घटना व नेतृत्त्व रचनेत सुस्पष्टता नाही. विधिमंडळ सदस्यांची संख्या पाहता 41 आमदारांचे पाठबळ अजित पवार गटाकडे दिसते. त्यामुळे अजित पवार यांना विधिमंडळ गटाचा पाठिंबा दिसून येतो. राष्ट्रीय कार्यकारणीने निवडल्याने अजित पवारांचा गट हीच खरी राष्ट्रवादी असल्याचे अध्यक्ष नार्वेकर यांनी जाहीर केले.

अजित पवार गटाचे सर्व आमदार पात्र आहेत. सर्वच्या सर्व पाचही याचिका निकालात काढण्यात आल्या आहेत. नवनवीन पक्षांसोबत व विचारसरणीसोबत हल्ली युती व आघाडी होताना आपण पाहत आहोत. पण त्याचा अर्थ प्रत्येक घटनेवर दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही. अजित पवार व शरद पवार या दोन गटांतील हा पक्षांतर्गत वाद आहे. त्यामुळे कुणीही पक्ष सोडलेला नाही. त्यामुळे दहाव्या सूचीनुसार कार्यवाही करता येत नाही. राष्ट्रवादीमध्ये अजित पवार गटाने बंडखोरी केली किंवा पक्ष नेतृत्त्वाविरोधात काम केले असे  म्हणता येणार नाही. शरद पवार गटाने दहाव्या सूचीचा उगाचच आधार घेऊ नये, अशी टिप्पणीही नार्वेकर यांनी केली.

Continue reading

बेंचप्रेस स्पर्धेत दिनेश पवार यांना सुवर्णपदक

द.आफ्रिका येथे सन सिटी शहरांमध्ये झालेल्या कॉमनवेल्थ क्लासिक आणि इक्विप्ड बेंचप्रेस स्पर्धेत मास्टर १ (४० वर्षांवरील पुरुष) या गटात ७५ किलो वजनी गटात रायगडच्या दिनेश पवार यांनी  सुवर्णपदक मिळविले. दिनेश पवार हे महड येथील रहिवासी असून खालापूर येथील स्पार्टन जिममध्ये सराव...

‘जय जय स्वामी समर्थ’ मालिकेत स्वामी समर्थांची ‘महामृत्युंजय’ लीला!

संपूर्ण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचलेली आणि प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केलेली कलर्स मराठीवरील 'जय जय स्वामी समर्थ' ही मालिका रंजक वळण घेताना दिसत आहे. प्रेक्षकांना स्वामी समर्थांच्या अद्वितीय आणि गूढ लीला या मालिकेत पाहायला मिळत आहेत. 'जय जय स्वामी...

वरूण सरदेसाईंची संभाव्य उमेदवारी ठाकरे सेनेला पडणार भारी?

फक्त आदित्य ठाकरे यांचा मावसभाऊ, या एकमेव लेबलवर उमेदवारी मिळवणाऱ्या वरूण सरदेसाई यांच्या विरोधात मुंबईतल्या वांद्रे पूर्वमधली उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले सैनिक कमालीचे संतप्त झाले असून वरूणची उमेदवारी लादली गेलीच तर मातोश्रीला चांगलाच धडा शिकवायचा अशी चर्चा त्यांच्यात सुरू झाली...
Skip to content